ताज्या बातम्या
बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?कराड तालुक्यातील घोगाव येथे दुर्दैवी घटना‘बेस्ट’ संपावर तातडीने तोडगा काढून ‘नीट’ परीक्षार्थींना दिलासा द्या – माजी खासदार राहुल शेवाळे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

साताऱ्यात तिरंगा रॅलीतून सिंदूर चे समर्थन पण मल्होत्राचा निषेध टाळलं…

सातारा(अजित जगताप) : छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा जिल्ह्यातील प्रत्येक खेड्यात सैनिक तयार होऊन देशाचे रक्षण करतात. एवढेच नव्हे तर देशातील कानाकोपऱ्यातील भारतीय लष्कर जवानांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी सातारा जिल्ह्यात भाजपने तिरंगा रॅली काढली. त्याची अनेकांनी समर्थन केले पण या रॅलीतून देशाशी गद्दारी करणाऱ्या ज्योती मल्होत्राचं नाम उल्लेख टाळला जात आहे ही बाब प्रकर्षाने जाणवू लागलेली आहे.
भारताचा स्वर्ग समजणाऱ्या जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानी अतिरेक्यांच्या हल्ल्यानंतर भारतीय लष्कर जवानांनी चोख उत्तर दिले आहे. ऑपरेशन सिंदूर मोहिमेले पाकिस्तान मधील दहशतवादी नष्ट केले तर दुसऱ्या बाजूला भारतीय सेनेचे मनोबल वाढवण्यासाठी भाजपने तिरंगा रॅली काढली.
नवलाईची गोष्ट म्हणजे या तिरंगा रॅलीतून देशाशी गद्दारी करणाऱ्या भाजपच्या काही कार्यकर्त्यांना अटक झाली . त्याचा उल्लेख टाळण्यामध्येच भाजपच्या काही उतावळ्या कार्यकर्त्यांनी धन्यता मानण्याचे चित्र सातारा जिल्ह्यात दिसत आहे.
भारत आणि पाकिस्तान मधील संबंध ताणले गेले आहेत. सुरक्षा यंत्रणा चोख कामगिरी करत आहे. दहशतवाद्यांची पाळीमुळे खुडून काढण्यासाठी लष्कर सज्ज आहे. अशा मध्येच पाकिस्तानी हेरांच्या संपर्कात असलेल्या भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्या ज्योती मल्होत्रा या युट्यूब चॅनलच्या तरुणीला लष्करी सुरक्षा यंत्रणेने अटक केली.
या गोष्टीमुळे संपूर्ण देश हादरला आहे. भाजपची ही दुसरी बाजू म्हणजे देशाशी गद्दारी करणाऱ्यांचे कधीही कुणी समर्थन करणार नाही. भाजपनेही समर्थन केलेले नाही. तरीसुद्धा याबाबत भाजपच्या पुढाकाराने निघत असलेल्या तिरंगा रॅली मध्ये जाणीवपूर्वक उल्लेख टाळण्याची चर्चा आता सातारा जिल्ह्यातील देशप्रेमी व माजी सैनिकांमध्ये सुरू झालेली आहे.
भारत जोडो यात्रा काढून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सर्व जाती धर्माला देशाबद्दल प्रेम ठेवा. असा सल्ला दिला होता. तसाच प्रकार भाजपमधील निष्ठावंत कार्यकर्ते करत आहेत. त्यांना धन्यवाद दिले पाहिजे. पण उठ सूट जेव्हा एखाद्या विशिष्ट समाजाचा आरोपी पोलिसांनी पकडल्यानंतर किंवा आपल्या राजकीय उद्दिष्टासाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांबद्दल जोडो मारो आंदोलन, रास्ता रोको आंदोलन, प्रतिमा दहन करणे. असा कार्यक्रम करणारे सातारा जिल्ह्यातील अनेक भाजप कार्यकर्त्यांच्या तोंडी आता पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून अटक केलेल्या ज्योती मल्होत्राचे नाव घेणे तिरंगा रॅलीतून टाळले जात आहे. हे प्रकर्षाने जाणवू लागलेले आहे.
समाज माध्यमातून सातत्याने भाजपशी एकरूप असलेल्या व देशाची गद्दारी करणाऱ्या ज्योती मल्होत्राचे कनेक्शन दिवसेंदिवस उघड होत आहे.पाकिस्तानी गुप्तहेर संस्थांकडून ज्योतीला हक्काची हस्तक म्हणून तयार केले जात होते. असा संशय व्यक्त केला जात आहे. भाजपचे कमळ चिन्ह गळ्यात घालून मिरवणाऱ्या व भगवं वस्त्र परिधान करून ज्योती मल्होत्राने समाज माध्यमावर यापूर्वीच अनेक पोस्ट टाकले आहेत. जम्मू-काश्मीरमधील पैलगामला जानेवारीत भेट दिली होती आणि काही महिन्याचं तिथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचे बळी गेले. याचाही आता तपास सुरू झालेला आहे. हिसरा चे पोलीस अध्यक्ष शशांक कुमार सावन यांनी पाकिस्तानी यंत्रणा समाज माध्यमावर भारतातील प्रभावशाली व्यक्तीला आपला हेतू साध्य करण्यासाठी वापरत आहेत. त्या अनुषंगाने ज्योती मल्होत्रा तयार केली . दुसऱ्या बाजूला ज्योती २०२३ मध्ये पाक उच्च आयुक्त कार्यालयात गेले असताना अहसान- रहीम उर्फ दानिश संपर्कात आली होती. त्यानंतर ती पाकिस्तानच गेली होती. ही बाब देश प्रेमी भारतीयांना समाज माध्यमातून समजले आहे.
वास्तविक पाहता देशाची गद्दारी करणाऱ्यांनी खऱ्या अर्थाने तिसरा डोळा दाखवून दिला आहे. परंतु, सातारा जिल्ह्यातील भाजपच्या तिरंगा रॅलीतून जाणीवपूर्वक त्याचा उल्लेख टाळून सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी ऑपरेशन सिंदूरच्या यशाबाबत भाजप तिरंगा रॅली काढत आहे. देशाच्या लष्करी जवानांचे कौतुक करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकांचे कर्तव्य आहेत. त्याचबरोबर देशाची गद्दारी करणाऱ्यांचा निषेध करणे. हे सुद्धा परम कर्तव्य आहे पण, निषेध करताना राजकीय अडचणीमुळे भाजपचे नेते व कार्यकर्ते स्वतःला लपवत आहे. त्यांचा हा दडलेला चेहरा उघड करण्याचे काम आता सातारा जिल्ह्यातील देशप्रेमी व्यक्ती व संघटनेने पुढे येऊन करावे अशी अपेक्षा माजी सैनिक व्यक्त करत आहेत.
दरम्यान, सध्या सातारा जिल्ह्यात भाजपमय वातावरण असल्यामुळे विरोधक शिल्लक नाही पण देशाशी गद्दारी करणाऱ्या ज्योती मल्होत्रा सारख्या प्रवृत्तीच्या निषेध करण्यासाठी अनेक जण सज्ज झाले आहेत. त्यामध्ये भाजपचेही निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. ही समाधानाची बाब आहे. अशी माहिती देशप्रेमी यांनी दिली आहे.

_______________________________
फोटो– सातारा जिल्ह्यात भाजपचे वतीने तिरंगा राहिलेल उदंड प्रतिसाद मिळाला..

Scroll to Top