ताज्या बातम्या
बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?कराड तालुक्यातील घोगाव येथे दुर्दैवी घटना‘बेस्ट’ संपावर तातडीने तोडगा काढून ‘नीट’ परीक्षार्थींना दिलासा द्या – माजी खासदार राहुल शेवाळे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

पियुश गोयल यांच्या प्रचारात गोपाळ शेट्टी यांचा गौरव ; मावळते खासदार गहिवरले

प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाचे उत्तर मुंबईचे उमेदवार आणि केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुश गोयल यांच्या प्रचारासाठी घेण्यात आलेल्या सभेत पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्याम कदम यांनी मावळते खासदार गोपाळ शेट्टी यांचा गौरव केला तेंव्हा ते अतीशय गहिवरले आणि त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. जेंव्हा केंव्हा गोपाळ शेट्टी यांच्या कार्याचे मूल्यमापन करण्यात येईल तेंव्हा इतिहासकारांना गोपाळ शेट्टी यांनीच उभारलेल्या बोरीवली पूर्व येथील राष्ट्रध्वजाच्या स्तंभाची उंची आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या नांवाने उभारण्यात आलेल्या प्रशस्त मैदानाचे क्षेत्रफळही मोजावे लागेल, अशा शब्दांत श्याम कदम यांनी गोपाळ शेट्टी यांच्या कार्याचा गौरव केला. भारतीय जनता पार्टी च्या गेल्या दहा वर्षांतील यशस्वी घोडदौडीचा उल्लेख करुन श्याम कदम म्हणाले की, भारतीय जनता पार्टी चा अश्वमेध इतका वेगाने दौडत आहे की तो अडवायला लव आणि कुश आता येऊ शकणार नाहीत. बोरीवली पूर्व येथील ॲम्ब्रोसिया येथे पियुश गोयल यांच्या प्रचारासाठी माजी नगरसेविका आसावरी पाटील यांनी सभा आयोजित केली होती. स्वतः पियुश गोयल, गोपाळ शेट्टी, भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रकाश सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.

Scroll to Top