ताज्या बातम्या

शिवजयंतीच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचा राबवलेला उपक्रम कौतुकास्पद :कराड शहर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ताशिलदार

कराड (प्रतिनिधी ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटीच्या वतीने शिवजयंतीच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,या शिबिरामध्ये तब्बल दीडशे जणांनी रक्तदान केले , या शिबिराचे उद्घाटन ,कराड शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ताशिलदार साहेब,यांच्या हस्ते करण्यात आले ,यावेळी कमिटीचे अध्यक्ष राहुल भोसले ,आनंदराव लादे, निशांत ढेकळे,सागर बर्गे ,सागर आमले दादा शिंगण, सुदेश थोरवडे, संदीप थोरवडे यांची प्रमुख उपस्थित होती.यावेळी बोलताना ताशीलदार म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटीच्या वतीने शिवजयंतीच्या निमित्ताने ,रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान हा राबवलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले ,या शिबिरामध्ये साधारण १५० रक्तदात्यांनी आपले रक्तदान दिले ,रक्तदात्यांना अक्षय ब्लड बँक सातारा यांच्या वतीने आकर्षक गिफ्ट व प्रमाणपत्र देण्यात आले ,हे शिबिर यशस्वी करण्यासाठी ओंकार थोरवडे, प्रणित थोरवडे ,सिद्ध वाघमारे, अनिकेत कांबळे ,श्रीकांत तारळेकर,आकाश माने रोहन लादे ,आदींनी परिश्रम घेतले

Scroll to Top