ताज्या बातम्या
बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?कराड तालुक्यातील घोगाव येथे दुर्दैवी घटना‘बेस्ट’ संपावर तातडीने तोडगा काढून ‘नीट’ परीक्षार्थींना दिलासा द्या – माजी खासदार राहुल शेवाळे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

भाजपच्या कुरघोडीने जावळीत शिवसैनिकांचा कोडमारा संपर्क दौऱ्यात उघड

मेढा(ajit jagtap): महाराष्ट्र मध्ये महायुतीचे सरकार असले तरी छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळी तालुक्यात उपमुख्यमंत्री शिंदे गटाच्या शिवसैनिकांचा कोंडमारा होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी आयोजित केलेल्या शिवसेनेच्या मेढा ता. जावळी येथे झालेल्या शिवसैनिकांच्या बैठकीत भाजपच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका करण्यात आली. या बैठकीला शिवसेना महिला संघटिका सौ शारदाताई जाधव, संपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे, विजय पाटील संदीप पवार व जयश्री शेलार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

निलेश लंके तालुकाप्रमुख ते खासदार पदापर्यंत पोचलेले कार्यकर्ते आहेत. , कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी तोडगा काढला पाहिजे. सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे. संघटना वाढेल पण,शिवसैनिकांना काय? युवा सेना तालुका प्रमुख चार चाकी घेऊन फिरतात. जिल्हा नियोजन एक सदस्य नाही. काम कसे करणार? सत्ता असूनही महायुती मध्ये स्वतःचा फायदा बघतात. जिल्हाप्रमुख शिवसैनिकामुळे असतो त्यामुळे शिवसेना नेत्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. असे मत. सचिन शेलार, यांनी व्यक्त केले.
शिवसेनेच्या या बैठकीला: चंद्रकात जाधव, सौ शारदा ताई जाधव, विजय पाटील, एकनाथ ओंबळे,सुलोचना पवार, संजय सुर्वे, कल्पना पवार,पांडुरंग सपकाळ, शांताराम कदम ता, समीर गोळे, प्रशांत जुनघरे, संदीप पवार, विक्रम जाधव, जयश्री शेलार,
निलेश निकम आधी शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सातारा जिल्हा पालकमंत्री पदी दोन वेळा शंभूराज देसाई यांची नियुक्ती झाली पण, जवळील भरीव निधी मिळाला नाही. अशी तक्रार शिवसैनिकांनी केली.
————— ———– ———– ———- ———– ——
फोटो – मेढा तालुका जावळी येथे मार्गदर्शन करताना शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव ( छाया — अजित जगताप)

Scroll to Top