ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

खास महाशिवरात्रीसाठी चेंबूरमध्ये साकारली ७ फुटाची शंकराची मूर्ती

मुंबई : चेंबूरमधील प्रसिद्ध शिल्पकार गुरुदेव मांद्रेकर यांनी खास महाशिवरात्रीसाठी पहिल्यांदाच ७ फुट उंचीची भगवान शंकराची रेखीव,
सुबक अशी अर्धमूर्ती साकारली आहे.या शिवमूर्तीची रसायनी पाताळगंगा येथील पुरातन शिव मंदिरात महाशिवरात्र कार्यक्रमात स्थापना केली जाणार आहे.

अवघ्या २० दिवसांत फायबर स्टोनची वॉटरप्रूफ अशी ही मूर्ती साकारण्याची किमया शिल्पकार मांद्रेकर यांनी केली आहे.चेंबूरच्या घाटला गाव मैदान परिसरातील कारखान्यात साकारलेली ही मूर्ती पाहण्यासाठी परिसरातील नागरिक गर्दी करताना दिसत आहेत.मांद्रेकर हे साईबाबा भक्त असून साईबाबा मूर्ती स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जातात.ते गेल्या ५० वर्षांपासुन विविध देवदेवतांच्या आणि महापुरुषांच्या मूर्ती बनवत आहेत.विशेष म्हणजे शिल्पकार मांद्रेकर हे दर गुरुवारी स्वखर्चाने आपल्या मूर्ती बनविण्याच्या कारखान्यात साईबाबांचा भंडारा आयोजित करून मोफत प्रसाद वाटप करत असतात.

Scroll to Top