ताज्या बातम्या
बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?कराड तालुक्यातील घोगाव येथे दुर्दैवी घटना‘बेस्ट’ संपावर तातडीने तोडगा काढून ‘नीट’ परीक्षार्थींना दिलासा द्या – माजी खासदार राहुल शेवाळे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

नितेश राणेंनी मुस्लिम विरोधी वक्तव्ये टाळावीत – चौधरी चॉदपाशा गफूरसाब

प्रतिनिधी : महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे वारंवार मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्ये करत असल्याने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश चिटणीस चौधरी चॉदपाशा गफूरसाब यांनी दिला आहे.

मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत चौधरी म्हणाले की, “राज्यात हिंदू-मुस्लिम ऐक्य अबाधित राहावे यासाठी नितेश राणे यांनी मुस्लिम विरोधी वक्तव्ये टाळली पाहिजेत. संविधानानुसार प्रत्येक नागरिकाला समान न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे, मात्र राणे आपल्या वक्तव्यांमधून मुस्लिम समाजाबद्दल आकस बाळगत आहेत, जे न्यायोचित नाही.”

चौधरी यांनी राणेंच्या पूर्वीच्या वादग्रस्त वक्तव्यांचा उल्लेख करताना सांगितले की, “कधी ते मशिदींमध्ये घुसून मारण्याची भाषा करतात, तर कधी उरुस आणि इस्तेमाविरोधात बोलतात. त्यांनी परीक्षांमध्ये बुरखा बंदीची मागणी केली आणि मुख्यमंत्र्यांना इस्तेमावर बंदीसाठी पत्र लिहिले. मात्र, मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांनी त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत जातीय सलोखा कायम ठेवला, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.”

राज्यात शांतता टिकवण्यासाठी आणि सामाजिक सौहार्द अबाधित राहण्यासाठी नितेश राणेंनी भविष्यात मुस्लिम समाजाविरोधी कोणतेही वक्तव्य करू नये, अशी विनंती चौधरी चॉदपाशा गफूरसाब यांनी केली आहे.

Scroll to Top