ताज्या बातम्या

पवईतील गौतम नगर विभागात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*

मुंबई :

सालाबादप्रमाणे यंदाही पवईतील गौतम नगर येथे अत्यंत उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरवात सामुदायिक राष्ट्रगीताने अणि भारतीय संविधानाच्या प्रस्तावना वाचनाने करण्यात आली.

सदर कार्यक्रमात स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले.विभागातील जेष्ठ व्यक्तींनी यावेळी प्रजासत्ताक दिन व भारतीय संविधान याबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले.कार्यक्रम यशस्वी रित्या संपन्न करण्यासाठी स्थानिक राहुल गच्चे आणि त्यांचे सहकारी यांनी मेहनत घेतली.
याप्रसंगी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून स्थानिक विद्यार्थ्यांना वह्या वाटप करुन शिक्षणासाठी प्रेरित करण्यात आले.

Scroll to Top