ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

सायरन न वाजविण्याच्या शिवेंद्रसिंहराजेंच्या सूचना

(प्रतिनिधी)- समाधानाकरीता पुरेपुर वापर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपल्या प्रशासकीय चमूला आपल्या विधानसभा मतदारसंघात ताफ्यातील वाहनांनी सायरन वाजवायचा नाही, अशी सूचना केली आहे. या सूचनेचे तंतोतत पालन प्रशासकीय चमूकडून होत आहे.

मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांना आपल्या राजकीय जीवनात बडेजावकी न करता मिळालेल्या अधिकाराचा जनतेच्या करायचा असा प्रयत्न केला आहे. सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळून जमिनीशी नात घट्ट धरुन जनतेच्या कामांचा निपटारा करण्याचा शिरस्ता शिवेंद्रराजे ठेवत आले आहेत. मंत्री म्हणून पहिल्यांदाच सातारा जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर प्रचंड जनसमुदाय त्यांना भेटण्यासाठी समोर आला. ते प्रत्येकाशी हसतमुख हस्तांदोलन करत होते. मंत्रिपदी निवड झाल्यानतंर प्रशासकीय प्रोटोकॉल पाळावा लागतो. मात्र, जनतेला मिरवून दाखवण्यापेक्षा जनतेच्या सर्वोच्च हिताला प्राधान्य देत मंत्री सायरनने नव्हे तर कामाने दिसतो हे शिवेंद्रराजेनी कृतीतून दाखवले.

Scroll to Top