ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

उध्दव ठाकरे यांच्या विनंतीनुसार सामाजिक कार्यकर्ते डॉ बाबा आढाव यांचे उपोषण मागे

पुणे :  ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी पुणे येथे विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या मतदानातील चढ-उतार आणि ईव्हीएम घोटाळ्याबाबत उपोषण सुरू केले होते. त्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस होता. आज शनिवारी सकाळपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार यांनी देखील उपस्थिती दाखवली होती. त्यांच्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील डॉ. बाबा आढाव यांची भेट घेऊन उपोषण मागे घ्यावे अशी विनंती केली होती. त्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुणे येथे जाऊन डॉ. बाबा आढाव यांची भेट घेतली आणि आपण आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती केली. पुढील आंदोलन महाविकास आघाडी करेल असे सांगितले. डॉ. बाबा आढाव यांना पाणी पाजून सदर उपोषण सोडले.

Scroll to Top