ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

महामानव डॉ आंबेडकर यांच्या महाप्रयान दिनी रात्रभर रेल्वे सुरू ठेवावी – खा. वर्षा गायकवाड यांची मागणी

मुंबई- संविधान निर्माते महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाप्रयाण दिनानिमित्ताने महामानवास अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी दरवर्षी मुंबईत दाखल होत असतात. मुंबईतील चैत्यभूमी येथे लाखोंचा जनसागर भेट देत असतो. दादरला भेट देण्यासाठी मुंबईतील लोकल सेवा ५ व ६ डिसेंबर २०२४ रोजी रात्रभर सुरू ठेवावी. अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पाठवलेल्या पत्रात खासदार वर्षा गायकवाड यांनी असेही म्हटले आहे की, दरवर्षी गणेशोत्सवात गणेशभक्तांसाठी मुंबईतील लोकलच्या विशेष फे-या रात्रभर सुरू असतात. महाप्रयाण दिनी  महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखो भीमसैनिक मुंबईत येतात. पालघर, ठाणे, नवी मुंबई येथून भिम सैनिक दादरला येतात. त्यांच्या सोयीसाठी लोकलची विशेष सेवा सुरू ठेवावी.

Scroll to Top