ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

धारावीत डॉ. ज्योतीताई गायकवाड यांच्या प्रचार रॅलीला महिलांची गर्दी

प्रतिनीधी : धारावी विधानसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. ज्योतीताई गायकवाड यांची प्रचार रॅली  प्रभाग क्रमांक 183 मध्ये आयोजित करण्यात आले होते. ही रॅली पारसी चाळ, गोल्ड फील्ड इमारत, काळा किल्ला या परिसरामध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात बघायला मिळत होती. तेवढ्याच संख्येने शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी, काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेक ठिकाणी डॉ. ज्योतीताई गायकवाड यांचे औक्षण करण्यात आले. मतदारांनी त्यांना आशीर्वाद दिले 

रॅलीमध्ये बोलताना डॉ. गायकवाड यांनी आमची लढाई ही आदानी बरोबर आहे, त्यामुळे माझ्यासमोर कोण उभा आहे याची मला चिंता नाही. धारावी परिवार आहे आणि तो माझ्यासोबत आहे. त्यामुळे ‘हम सब एक है’ असा नारा दिला. नई रोशनी लायी है, ज्योतीताई आयी है….अशा घोषणांनी परिसर दणाणून जात होता.

Scroll to Top