ताज्या बातम्या
धारावीकरांना ५००, चाळी-इमारतीतील रहिवाशांना १,००० चौ. फुटांची घरे द्या ; मास्टर प्लॅन व पुनर्वसनाची कायदेशीर हमी मिळेपर्यंत करार न करण्याचे आवाहन‘वाजवा शाळेचा गजर, नको रे बाबा पुन्हा गेट टू गेदर!’ जुन्या आठवणी, मैत्री आणि नातेसंबंधांचा वास्तववादी वेध; आवर्जून पाहावे असे नाटकखारघर हिल महापौर मॅरेथॉन’ स्पर्धेत आयुक्त डॉ. शिंदे यांची यशस्वी धावगणेशोत्सवाच्या उत्साहाला गालबोट! २२ फुटी ‘भुलेश्वरचा राजा’ अचानक कोसळला; २ जणांचा मृत्यू, ५ जखमी”व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पाणी कपात रद्द

प्रतिनिधी : जुलै महिन्यात मोरबे धरण क्षेत्रात आज (शुक्रवार) जुलैपर्यंत मोरबे धरण क्षेत्रामध्ये एकूण 2407 मिमी इतका पाऊस झाला आहे. यामुळे मोरबे धरणामध्ये एकूण 74 % पाणी साठा उपलब्ध झाल्याने नवी मुंबई महापालिकेने 15 जूनपासून सुरू केलेली नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पाणी कपात रद्द केली आहे. 29 जुलैपासून पाणी पुरवठा नियमितपणे सुरू केला जाणार असल्याची माहिती अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे यांनी दिली.

महानगरपालिकेच्या मोरबे धरणामधून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रास पाणीपुरवठा होत असून, यावर्षी पावसाळी कालावधी सुरू होऊनही 15 जूनपर्यंत केवळ 78.60 मिमी इतकाच अपुरा पाऊस झालेला होता. त्यावेळी मोरबे धरणामध्ये फक्त 26 % इतकाच पाणी साठा शिल्लक होता. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये पाणी पुरवठा करताना संध्याकाळच्या पाणी पुरवठयात वाढीव कपात करण्यात आलेली होती. मोरबे धरणाची पाणी पातळी खालावल्याने सुरूवातीला 28 दिवस पुरेल एवढा पाणी साठा शिल्लक होता. त्यामुळे नवी मुंबईतील आठ ही विभागात आठवड्यातून चार दिवस एकवेळ पाणीकपात सुरू केली.

Scroll to Top