मेढा (अजित जगताप) : कितीही कोंबड झाकले तरी उजेड होतो. त्याची प्रचिती जावळी तालुक्यात पाहण्यास मिळत आहे. मेढा नगरीत विद्युत दाबामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. लोकप्रतिनिधींनी विकास केला असेल तर मग, जावळी तालुक्यात वितरण कंपनीच्या विद्युत दाब सहन का करावा लागतो? असे प्रश्न उपस्थित केला जात आहे. यानिमित्ताने गैरसोयीच्या पण ,रांगा उघडकीस आले आहेत.
जावळी तालुक्याचे प्रमुख ठिकाण असलेल्या मेढा नगरीमध्ये सातारा- मेढा रस्त्यावरील सी.एन.जी. गॅस- पेट्रोल पंपावरील गॅस भरण्यासाठी पर्यटकांच्या भल्या मोठ्या वाहनांच्या रांगेमुळे ही बाब उघडकीस आली आहे. वास्तविकता चार महिन्यांमध्ये दहा रुपयापर्यंत सीएनजी गॅसची दरवाढ करण्यात आली आहे. सध्या सुमारे ९५ रुपये किलो प्रमाणे सी.एन.जी. विकला जात आहे. विद्युत दाबामुळे जावळी तालुक्यात अनेकांच्या विद्युत उपकरणाला फटका बसला आहे. मेढा नगरीत पर्यटकांच्या जागृतीमुळे ही बाब निदर्शनास आली आहे. आता तातडीने याबाबत उपाययोजना होणे गरजेचे आहे.
जावळी तालुक्यात मोठ्या प्रमाणात काही महाभाग हे अंधभक्त प्रमाणे लोकप्रतिनिधींच्या कौतुकासाठी जागोजागी बॅनर व पोस्टरबाजी तसेच काही प्रसारमाध्यमांच्या मर्जीने अमाप प्रसिद्धी दाब सहन करतात. परंतु, मूलभूत गरजेकडे लक्ष देणारा कोणी वाली राहिलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक जावळी तालुक्यातील १३२ गावे आहेत. या गावच्या विकासाबाबत लक्ष देण्यापेक्षा काही सत्तापक्षप्रेमी कार्यकर्ते व लोकप्रतिनिधीच्या आश्रयाखालील प्रस्थापित मंडळी सातारा जिल्हा बँकेच्या विकास सोसायटीच्या मतदार संघातील संचालक निवडणुकीत गुंतलेली आहे. वेडात मराठे वीर दौडले सात.. असे भासवून सणासुदीला घरदार सोडून सहलीचा आनंद घेत आहेत . तर दुसऱ्या बाजूला पर्यटन वाढवणाऱ्या जावळीत सत्तेच्या नूतनीकरणासाठी गॅस व पेट्रोल पंप वाहनांसारखी गावोगावी दोन गटात गर्दी दिसत आहे. यापूर्वी जावळी तालुक्यात हे चित्र दिसत नव्हते. आता मोदी आहे तो मुमकिन आहे. याची आठवण सर्वांना होऊ लागलेली आहे. अर्थात सत्ताधारी महायुती मधील भाजप पक्षाने मंडप घातला तर विरोधक त्यावर झालर बसवतात. हे सुद्धा विसरून चालणार नाही. निसर्गरम्य जावळी- महाबळेश्वर- सातारा तालुक्यातील पर्यटन स्थळ असलेल्या महाबळेश्वरला जाणाऱ्या अनेक पर्यटक व वाहनचालकांनी जावळी तालुक्यातील मेढा येथील सी.एन.जी. गॅस वाहनात भरण्यासाठी पंपाच्या आजूबाजूला भली मोठी रांग लावल्यामुळे विद्युत दाब संकट ही बाब उघडकीस आली आहे. अन्यथा याकडे दुर्लक्ष करून नेत्यांच्या कार्याचीच ओळख करून देण्यामध्येच धन्यता मानली असती. याचीही दबक्या आवाजात चर्चा होत आहे. आता विद्युत दाबाची बाब उजेडात आल्यामुळे अनेकांच्या पायाखालची वाळू अंधारात सरकू लागलेली आहे. नेत्यांची मर्जी सांभाळताना जनतेचे होणारे हाल अखेर पर्यटकांनीच नाराजी व्यक्त करून दाखवून दिल्यामुळे जावळी तालुक्यातील ही बाजू आता सत्ताधारी पक्षातील स्वयंघोषित तालुक्यातील नेत्यांसाठी काही प्रमाणात का होईना. धोक्याची घंटा ठरली आहे. समाज माध्यमावर आता लोकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. कारण, देशभर समाज माध्यमातूनच आता सत्तेतील राजकीय पक्षांनी केलेले अन्यायकारक काही बाबी उघडकीस येत आहेत. तशी जावळी तालुक्यात एक दिवस परिस्थिती येईल असे भाकीत वर्तवले जात आहे.




