ताज्या बातम्या

आमदार दिलीप लांडे आयोजित भव्य कावड यात्रेला हजारो भाविकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मुंबई(शांताराम गुडेकर ) : चांदिवली मध्ये सालाबादप्रमाणे श्रावण महिन्यात काढण्यात येणाऱ्या कावड यात्रेला हिंदू बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या कावड यात्रेत हर हर महादेव, बम बम बोले चा आवाज घुमला आहे. शिवसेना चांदिवली विधानसभा क्षेत्राच्या वतीने आमदार दिलीप (मामा) लांडे यांच्या नेतृत्वाखाली, हिंदू संस्कृती व परंपरा जोपासण्यासाठी,भगवान शंकराच्या जयघोषात व भगव्या वातावरणात, हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या डी.जे.च्या गाण्याच्या तालावर, फटाक्यांच्या अतिषबाजीत रविवार दिनांक ३० ऑगस्ट रोजी शितल तलाव ते काजूपाडा पाईप लाईन मार्गे श्री शंभो महादेव मंदिर पर्यंत भव्य कावड यात्रा आयोजित करण्यात आली होती. श्रावण महिन्यात सालाबाद प्रमाणे या वर्षी आमदार दिलीप लांडे यांच्या माध्यमातून कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या कावड यात्रेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या कावडयात्रेत हजारो उत्तर भारतीय महिला भगवी साडी परिधान करून श्री शंभो महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करण्यासाठी घागर/कलश घेऊन सहभागी झाल्या तसेच शेकडो पुरुष हे भगवे कुर्ते परिधान करून कावड घेऊन आले होते. या कावडयात्रे दरम्यान भगवान शंकराची दोन भव्य मूर्ती देखावा प्रदर्शित करण्यात आले. या कावडयात्रेसाठी खास तीर्थक्षेत्र काशी वरून पवित्र जल आणून श्री शंभो महादेव महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करण्यात आला. भगवी ताकद, भगवी शक्ती व भक्ती एकत्रित करून भगवी ताकद महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी पर्यायाने महाराष्ट्रात असलेले हिंदुत्ववादी शिवसेना भाजप सरकारच्या पाठीशी उभी करण्याच्या दृष्टीने कावडयात्रेचे आयोजन करण्यात आले असे प्रतिपादन आमदार, विभागप्रमुख दिलीप लांडे यांनी केले. भगवान श्री शंभो महादेवाच्या पिंडीवर तीर्थक्षेत्र काशीच्या जलाने अभिषेक करून चांदिवलीचा विकास करण्यासाठी ताकद मिळो अशी प्रार्थना करण्यात आली. यावेळी चांदिवलीतील नगरसेविका शैला दिलीप लांडे, युवा सेना महाराष्ट्र कार्यकारिणी अध्यक्ष प्रयाग दिलीप लांडे, प्रणव दिलीप लांडे, शाखाप्रमुख नितीन गोखले शैलेश निंबाळकर बाबू मोरे आदीसह उत्तर भारतीय संघ चांदिवली राष्ट्रीय अध्यक्ष श्री रामप्रसिद्ध दुबे आणि महिला तालुकाध्यक्ष सरिता मिश्रा यांच्यासहित
शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Scroll to Top