शाहूपुरी(अजित जगताप) : सातारा शहरात नजीक असलेल्या शाहूपुरी ग्रामपंचायत स्थापना झाल्यापासून चौकामध्ये भाडेतत्त्वावर काही गाळे होते. आता सातारा नगरपालिका हद्द वाढ झाल्यापासून हा भाग आणि त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी नोटीस देण्यात आली होती. त्याला २४ तास उलटण्याच्या अगोदरच जेसीबीच्या साह्याने अतिक्रमण उद्ध्वस्त केले. मग पंचवीस वर्ष भाडे कोण खात होते? असा मार्मिक प्रश्न उपस्थित केला जात आहे.
याबाबत माहिती अशी की, सातारा शहरानजीक असलेल्या गेंडामाळ परिसरात मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती वाढू लागली. याच ठिकाणी महत्त्वाच्या शाहूपुरी चौकामध्ये सातारा जिल्हा परिषद सेवक गृहनिर्माण संस्थेमार्फत वसाहत सुरू झाली. या वसाहतीला आवश्यक असणारे पाणी, वीज आणि वित्त संस्थेमार्फत कर्जपुरवठा करून अनेकांनी घर बांधले आहे. पंचवीस वर्षापासून या ठिकाणी अनेक जण राहतात. काहीजणांनी भाडेतत्त्वावर अनेक व्यवसायिकांना ही जागा दिली होती. सातारा नगरपालिका अतिक्रमण विरोधी विभागाने नोटीस पाठवून त्वरित जेसीबीच्या साह्याने हा परिसर मोकळा केला आहे. सदर रस्त्यामध्ये अतिक्रमण होत असल्याने हा रस्ता मोकळा केला असला तरी सदरचा रस्ता १२ किंवा १४ मीटर रुंद आहे. असे स्थानिक रहिवाशांनी सांगितले.
या ठिकाणी अनेकांच्या उपजीविकेचे साधन म्हणून छोटे-मोठे व्यवसाय सुरू होते. आता त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. निवडणुकीच्या काळामध्ये मतं मागण्यासाठी येणारे मात्र याबाबत मौन धारण करत आहेत. असाही आरोप होत आहे. सरसकट अतिक्रमण निघाले पाहिजे. या ठिकाणी फारसा मोठा अपघात झाला नाही. तरीही अतिक्रमण काढण्यात आली. काहींची या विरोधात न्यायालयात दाद मागितली आहे. दरम्यान, अतिक्रमण उध्वस्त केल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. तर काहींच्या उपजीविकेच प्रश्न निर्माण झाला आहे. सदर अतिक्रमणांमधून काहींनी आपल्या संसार उपयोगी वस्तू घेऊन जाण्यासाठी लगबग सुरू केली आहे. गड्या आपली शाहूपुरी ग्रामपंचायत बरी होती. आता विकतच दुखणं आपण घेतले आहे. अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. सातारा नगरपालिकेने जी कारवाई केलेली आहे. त्याचे काहीजण समर्थन करत आहे. भटाला दिली ओसरी… भट हात पाय पसरी असे वाक्य काहींनी बोलून दाखवली आहे.
—————————————————-
फोटो – सातारा शहरा नजीक शाहूपुरी चौकात अतिक्रमण उध्वस्त झाल्यानंतरची स्थिती (छाया -अजित जगताप, शाहूपुरी)




