मुंबई : बृहन्मुंबई बेरोजगार व सेवा सहकारी संस्थांचे फेडरेशन लि. (बृहन्मुंबई, मुंबई शहर, मुंबई पूर्व उपनगरे तसेच मुंबई पश्चिम उपनगरे १ व २) आणि मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सहकार भूषण पुरस्कार-२०२६’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम मंगळवार, दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ वाजता, मुंबईतील वसंतदादा पाटील सभागृह, मुंबई बँक भवन, २०७, डॉ. डी. एन. रोड, पहिला मजला, फोर्ट, मुंबई-४००००१ येथे होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. ना. श्री. प्रवीण दरेकर, अध्यक्ष, महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयंपुनर्विकास प्राधिकरण (कॅबिनेट दर्जा), अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित तसेच अध्यक्ष, मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. हे राहणार आहेत.
सहकार राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मा. ना. डॉ. पंकज भोयर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच सहनिबंधक, सहकारी संस्था, मुंबई विभाग मा. श्री. शहाजी पाटील यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
कार्यक्रमाला मुंबई बँकेच्या संचालक मंडळातील मा. श्री. विनोद बोरसे, मा. श्रीमती जयश्री पांचाळ, मा. श्री. शिवाजीराव नलावडे, मा. श्री. नंदकुमार काटकर, मा. श्री. जिजाबा पवार, मा. श्री. विठ्ठलराव भोसले, मा. श्री. आनंदराव गोळे, मा. श्री. अनिल गजरे आणि मा. श्रीमती कविता देशमुख यांची उपस्थिती राहणार आहे.
याशिवाय मा. श्री. सिद्धार्थ कांबळे, उपाध्यक्ष, मुंबई बँक; मा. आ. श्री. प्रसाद लाड, मा. आ. श्री. सुनील राऊत, मा. श्री. प्रकाश दरेकर, मा. श्री. संदीप घनदाट, मा. श्री. पुरुषोत्तम दळवी, मा. श्री. विष्णू घुमरे, मा. श्रीमती शिल्पा सरपोतदार तसेच मुंबई बँकेचे कार्यकारी संचालक मा. श्री. संदीप सी. सुर्वे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या पुरस्कार सोहळ्यात सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यात येणार असून, कार्यक्रमादरम्यान व्यावसायिक व प्रेरणादायी वक्त्यांचे मार्गदर्शनही लाभणार आहे.
सहकार क्षेत्रातील विविध संस्था, पदाधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.




