ताज्या बातम्या

मिरा-भाईंदरमध्ये परवानाधारक गटई स्टॉलवरील कारवाईविरोधात चर्मकार समाजाचा निषेध; चौकशीची मागणी

मिरा-भाईंदर ३ जुलै : मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीतील भाईंदर पश्चिम येथे परवानाधारक गटई (चर्मकार) स्टॉलवर करण्यात आलेल्या कारवाईबाबत चर्मकार समाजातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
चर्मकार समाजाच्या प्रतिनिधींचा आरोप आहे की, भाजप नगरसेविका तथा प्रभाग समिती क्रमांक १ च्या सभापती वर्षा गिरिधर भानुशाली आणि नवनियुक्त प्रभाग अधिकारी दिपाली पवार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लेखी आदेशांशिवाय संबंधित स्टॉलवर कारवाई केली. संबंधित गटई स्टॉल अनेक वर्षांपासून अधिकृत परवान्याने सुरू असून, परवाना असतानाही कारवाई का करण्यात आली, असा सवाल समाजबांधवांनी उपस्थित केला आहे.
या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून कारवाईस जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्रातील, विशेषतः मुंबईतील विविध चर्मकार संघटनांनी या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणाबाबत संबंधित लोकप्रतिनिधी किंवा महानगरपालिका प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. ती समोर आल्यानंतर त्यालाही योग्य प्रसिद्धी दिली जाईल.

Scroll to Top