मुंबई : दिल्लीतील जंतर-मंतर येथे सीजेपीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर अन्यायकारक निर्दयी लाठीचार्जच्या निषेधार्थ आज भीम आर्मीच्या वतीने एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
मालाड पूर्व राणी सती रोड येथे आयोजित
या उपोषणामध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांवरील कारवाईचा तीव्र निषेध व्यक्त केला. आंदोलनादरम्यान अनेक विद्यार्थी जखमी झाल्याचा आरोप करण्यात आला असून, या घटनेची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी उपस्थित वक्त्यांनी सांगितले की, लोकशाहीमध्ये विद्यार्थ्यांना शांततापूर्ण मार्गाने आपले प्रश्न मांडण्याचा घटनात्मक अधिकार आहे. अशा आंदोलनांवर बळाचा वापर करणे योग्य नसून, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारने संवादाच्या माध्यमातून तोडगा काढावा.
उपोषणादरम्यान सहभागी कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांशी ऐक्य व्यक्त करत, शिक्षण, रोजगार आणि सामाजिक न्यायाच्या प्रश्नांवर सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी केली.
भीम आर्मीचे महाराष्ट्र महासचिव सुनील गायकवाड यांनी इशारा दिला की, विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात अधिक तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल. या उपोषणात सुनील गायकवाड, मंगलाताई गायकवाड, गौतम सोनी, बाळू साळे तसेच सतीश साळवे हे सहभागी होते..




