मुंबई : दादर येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात आयोजित करण्यात आलेल्या भव्य पुरस्कार सोहळ्यात उत्कृष्ट संपादक, पत्रकार व कवी,लेखक, दिग्दर्शक निर्माता, पटकथा,अभिनय गायक , संगीतकार, नृत्य,श्री. प्रमोद सूर्यवंशी यांना प्रतिष्ठेचा ‘विवेक-दीप पुरस्कार २०२६’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
साहित्य, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन श्री. सूर्यवंशी यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला साहित्य, पत्रकारिता, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
सन्मा. श्री. श्रीधर कीर (जागप्रसिद्ध बोलका बाहुलाकार आणि जादूगार)
सन्मा. प्रा. विष्णुभाऊ बापट (सादरकर्ते: “कुटुंब रंगलंय काव्यात”)
सन्मा. श्री. अरुण म्हात्रे (प्रसिद्ध कवी, साहित्यिक)
सन्मा. श्री. पंढरीनाथ तामोरे (साहित्याचार्य, संपादक – दर्दीचा राजा)
सन्मा. श्री. गुरुनाथ मधुसूदन तिरपणकर (ज्येष्ठ पत्रकार, संस्थापक अध्यक्ष: जनजागृती सेवा संस्था (रजि.))
सन्मा. डॉ. सुनील भार्गवराम शिंदे (संस्थापक, अध्यक्ष: शिंदे जनकल्याण प्रतिष्ठान (रजि.))
सन्मा. श्री. वैभव सुरेश कदम (समाजसेवक, अध्यक्ष – सी आय बी संघटना, महाराष्ट्र)
सन्मा. श्री. कृष्णा बाळू काजरोळकर (समाजसेवक, माजी कोषाध्यक्ष/संचालक – शुभश्री हॉस्पिटल, दादर)
सन्मा. डॉ. गौरव जयवंत पाटील (प्रसिद्ध अभिनेते, समाजसेवक)
सन्मा. श्री. अतुल तोडकरी (स्पेस रिअलटर्स) या सर्व मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर श्री. प्रमोद सूर्यवंशी यांनी हा सन्मान आपल्या वाचक, सहकारी आणि साहित्यप्रेमींना समर्पित करत, भविष्यातही लेखणीच्या माध्यमातून समाजहिताचे कार्य अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
या उल्लेखनीय यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील साहित्यिक, पत्रकारितेतील व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.




