ताज्या बातम्या

सातारा जि प सभेला फक्त प्रिंट मीडियाला उपस्थित राहण्याची परवानगी…

सातारा(अजित जगताप)’: सातारा जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक १० जुलै रोजी दुपारी एक वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये संपन्न होत आहे. या सभेसाठी साताऱ्यातील फक्त प्रिंट मीडियाला उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. अशी माहिती सातारा जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी औपचारिक गप्पा मारताना दिली.
सातारा जिल्हा परिषदेची मागील सर्वसाधारण
झालेल्या सभेचा कार्यवृत्तांत वाचून कायम करण्या बाबत विचार करणे.सातारा जिल्हा परिषदेची मागील सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आलेल्या ठरावावर करण्यात आलेल्याकार्यवाहीचा आढावा घेणे.
महाराष्ट्र शासनाकडून आलेले शासन निर्णय/परिपत्रके यांचे अवलोकन करणे.,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या खोल्या निर्लेखन करणेस/पाडण्यास जि.प.सर्वसाधारण सभेची कार्योत्तर मान्यता मिळणे .सातारा जिल्हा परिषदेची सन २०२६-२०२७ ची दैनंदिनी छापाई करता येणाऱ्या रक्कम रुपये १.०० लक्षचे खर्चास जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेची मान्यता घेणे

बांधकाम विभाग दक्षिण अधिनस्त लेखाशिर्षक जि.प. प्राथमिक शाळांची विशेष
दुरुस्ती करणे अंतर्गत मौजे विसापूर ता. खटाव
जि. सातारा येथे जि. प. प्राथमिक शाळा नवीन आठ खोल्या बांधणेकामी प्राप्त दरानुसार ई-निविदा स्विकारणेस मान्यता देणे बाबत विचार करणे.भवानी पेठ सि.स.नं. २७० (पशुवैद्यकीय चिकित्सालय, राजवाडा) ही जागा(मालमत्ता) सातारा नगर परिषदेकडे हस्तांतरीत करणेबाबत. ग्रामपंचायत विभागाकडील जिल्हा परिषद अधिनस्त तालुकानिहाय जीर्णझाल्याने व वापरास अयोग्य असल्याने मोडकळीस आलेल्या जुन्या इमारती व पाण्याच्या टाक्या निर्लेखित करण्या बाबत केलेल्या कार्यवाहीचे अवलोकन करुन
मान्यता देण्याबाबत विचार करणे.
समाजकल्याण विभागाअंतर्गत जि. प. स्वनिधी पाच टक्के अंतर्गत विज्ञान शाखेत
शिक्षण घेत असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना खर्च करण्याचा सभेत ठराव घेण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या या दुसऱ्या सभेसाठी सातारा जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

बांधकाम उत्तर विभागाअंतर्गत जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या प्रशासकिय व निवासी
इमारतींच्या देखभाल दुरुस्तीकरीता सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी
निधी वितरण करण्याबाबत व लेखाशीर्ष २०५९ ४५३१ ( योजनांतर्गत) निधी वितरीत झालेल्या कामांस प्रशासकिय मान्यतेसाठी
सर्वसाधारण सभेचा अनुषंगीक ठराव देणे. अशा १८ विषय तसेच अध्यक्षांच्या परवानगीने येणारे ऐनवेळीचे विषयावर चर्चा होणार आहे.
सातारा जिल्हा परिषद पदाधिकारी व साताऱ्यातील पत्रकारांमध्ये समन्वय साधण्यासाठी आज सातारा जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभागृहात औपचारिक बैठक झाली.
त्यावेळी सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी या यशानी नागराजन, निलेश घुले, गावडे, शिक्षण व अर्थ समिती सभापती, कृषी सभापती व महिला बालकल्याण सभापती तसेच पत्रकार उपस्थित होते. सातारा जिल्हा परिषदेच्या कामकाजाबाबत पत्रकारांनी योग्य ती भूमिका घ्यावी. जिल्हा परिषदेचा नावलौकिक कायम ठेवण्यासाठी पदाधिकारी प्रयत्न करत आहेत. पत्रकारांनी साथ द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. दरम्यान, शुक्रवार दिनांक १० जुलै रोजी दुपारी एक वाजता होणारी सातारा जिल्हा परिषदेची सर्वसाधारण बैठक ही खेळीमेळीच्या वातावरणात होणार आहे. त्यापूर्वी भाजपची पार्टी मीटिंग होईल .असा आत्मविश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केला आहे. सातारा जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेला फक्त प्रिंट मीडियाला परवानगी देण्यामागे वादग्रस्त मुद्दे युट्युबवर सातत्याने प्रसारित होत असल्याने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. सभेची माहिती देण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये पत्रकार परिषद होईल असे स्पष्ट केले.

चौकट—— सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी डॉ. प्रियाताई महेश शिंदे यांची निवड झाल्यापासून आतापर्यंत त्यांचे पती आमदार महेश शिंदे हे कधीही अध्यक्षांच्या दालनात आले नव्हते. महिला सक्षम रित्या कामकाज करतात. त्यामुळे आता अनेक महिला सभापती यांनीही कामकाजाकडे स्वातंत्ररीत्या लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. कार्यकर्ता म्हणून काही सभापतींचे पती यांना विकास कामांसाठी लोक भेटतात. लोकांची कामे होणे महत्त्वाचे आहे. समोर तुमच्या पतीचा कुठेही हस्तक्षेप होत नाही. स्वतः जिल्हा परिषद सभापती हे सभापती कामकाज कामकाज करतात. असा खुलासा केला आहे.

———————————————+—–+
फोटो– सातारा जिल्हा परिषदेच्या कामकाजाबाबत माहिती देताना पदाधिकारी (छाया- अजित जगताप, सातारा)

Scroll to Top