ताज्या बातम्या

मलकापूर स्मशानभूमीजवळ ड्रेनेज पाईप ओव्हरफ्लो; सांडपाणी रस्त्यावर, नागरिक त्रस्त

कराड (प्रताप भणगे) : मलकापूर येथील स्मशानभूमीजवळ ड्रेनेज पाईप ओव्हरफ्लो होत असल्याने सांडपाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिक, वाहनधारक आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
सांडपाणी रस्त्यावर सतत वाहत असल्याने रस्ता निसरडा बनला असून अपघाताचा धोका वाढला आहे. तसेच अस्वच्छतेमुळे डासांची पैदास होऊन विविध साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. या मार्गावरून दररोज मोठ्या संख्येने नागरिकांची ये-जा होत असतानाही समस्या कायम असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या समस्येकडे संबंधित विभागाचे वारंवार लक्ष वेधूनही अद्याप कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाने तातडीने ड्रेनेज लाईनची दुरुस्ती करून रस्त्यावर वाहणारे सांडपाणी थांबवावे आणि परिसराची स्वच्छता करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Scroll to Top