ताज्या बातम्या

तेली समाजाच्या विविध मागण्यांबाबत उपेक्षित

मुंबई(रमेश औताडे) : राज्य तेली समाज समन्वय समितीने राज्यातील तेली समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत राज्य सरकारकडे निवेदन दिले आहे. त्या मागण्यांबाबत सरकारने सकारात्मक निर्णय घेऊन न्याय द्यावा अशी मागणी समितीचे अध्यक्ष प्रा. प्रकाश डवले यांनी मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्रात तेली समाजाची लोकसंख्या मोठी असून समाजाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. मात्र, लोकसंख्येच्या प्रमाणात अपेक्षित प्रतिनिधित्व व विकासाच्या संधी समाजाला मिळालेल्या नसल्याचा दावा अध्यक्ष सरचिटणीस प्रशांत शेवतकर यांनी केली. यावेळी अभिजित डवले, ऍड किशोर लांजेवार, हिरामण सांगे, घनश्याम बोराखडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

समाजातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय स्तरावर वसतिगृहे उभारावीत, संत संताजी जगनाडे महाराज आर्थिक विकास महामंडळासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, विविध शासकीय मंडळे, समित्या आणि वैधानिक संस्थांवर लोकसंख्येच्या प्रमाणात समाजातील पात्र व्यक्तींना संधी द्यावी तसेच पारंपरिक तेल घाणी उद्योगाला चालना देण्यासाठी विशेष अनुदान योजना राबवावी. उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरांमध्ये विद्यार्थी येतात. आर्थिक अडचणींमुळे त्यांना निवास आणि शिक्षणाचा खर्च पेलणे कठीण जाते. त्यामुळे शासकीय वसतिगृहांची उभारणी आवश्यक आहे.

Scroll to Top