मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीत संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलने सलग दुसऱ्यांदा दणदणीत विजय मिळवला. विष्णू सोनावणे यांच्या नेतृत्वाखालील निर्भीड पॅनलला पराभव स्वीकारावा लागला.
आझाद मैदान येथील पत्रकार संघाच्या कार्यालयात शनिवारी खेळीमेळीच्या वातावरणात मतदान पार पडले. मतदानानंतर तात्काळ झालेल्या मतमोजणीत परिवर्तन पॅनलने बहुमत मिळवत सर्व प्रमुख पदांवर वर्चस्व राखले. अध्यक्षपदी
संदीप चव्हाण, कार्यवाहपदी
शैलेंद्र शिर्के, विश्वस्तपदी
प्रकाश कुलकर्णी आणि कोषाध्यक्षपदी
जगदीश भोवड यांची निवड झाली.
कार्यकारिणी सदस्यपदासाठी झालेल्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचे सर्व नऊ उमेदवार विजयी झाले. उपाध्यक्षपदी राजेंद्र हुंजे आणि स्वाती घोसाळकर यांची निवड झाली. कार्यकारिणी सदस्य म्हणून गजानन सावंत (दैनिक सामना) यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवला. त्यांच्यासह दिवाकर शेजवळकर, विनोद साळवी, आत्माराम नाटेकर, रजनीश राणे, अंशुमन पोयरेकर, सारंग दर्शने, राजेश खाडे आणि किरीट गोरे हेही विजयी झाले.
Post Views: 28