ताज्या बातम्या

प्रतिज्ञापत्रावरील आक्षेपांमुळे तृष्णा विश्वासराव चर्चेत

मुंबई(रमेश औताडे) : बेस्ट समितीच्या अध्यक्षा आणि शिवसेना नगरसेविका तृष्णा चंद्रकांत विश्वासराव यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रासंदर्भात काही मुद्दे उपस्थित करत बांधिलकी सामाजिक संघटनेने संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत संघटनेचे अध्यक्ष प्रमोद सावंत, कमलाकर शिंदे आणि रुपेश पुरळकर यांनी विश्वासराव यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्राबाबत काही आक्षेप नोंदविले.

संघटनेच्या प्रतिनिधींनी दावा केला की, निवडणूक नामांकन प्रक्रियेदरम्यान सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्राच्या काही बाबींबाबत शंका निर्माण होत असून त्याची सखोल पडताळणी होणे आवश्यक आहे. प्रतिज्ञापत्रातील काही तांत्रिक बाबी तसेच मालमत्तेच्या घोषणेशी संबंधित मुद्द्यांवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले.

Scroll to Top