नवी दिल्ली(अजित जगताप) : सार्वजनिक आरोग्य सेवा महाराष्ट्र राज्यात अधिक सक्षम व्हावी. यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झालेले आहेत. महाराष्ट्रातील महायुतीचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी नवी दिल्लीत राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या (एन. एच. एम.) केंद्रीय अतिरिक्त सचिव व व्यवस्थापकीय संचालक आराधना पटनाईक यांची कर्तव्य भवन मध्ये भेट घेतली. यावेळी चालू वर्षाच्या आरोग्यविषयच्या कार्यक्रमाच्या अंमलबजावणी आराखड अंतर्गत निधी देण्याची मागणी केली. तसेच बालकांच्या शस्त्रक्रियेची वयोमर्यादा पाच वर्षापर्यंत वाढवणार असे स्पष्ट केले.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत (आर बी एस के) कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रियेसाठी लाभार्थी बालकांची वयोमर्यादा पाच वर्षांपर्यंत वाढवणार आहेत. असा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. याचा हजारो बालकांना फायदा होणार आहे.
आरोग्य सेवेबाबत थेट संपर्क ठेवणाऱ्या आशा सेविका महत्वाचे योगदान देत आहेत.आशा स्वयंसेविकांचे प्रोत्साहनपर मानधन वेळेत वितरित करण्यासाठीही केंद्र सरकारकडून विना विलंब निधी उपलब्ध व्हावा.
जननी सुरक्षा योजना (जे. एस. वाय.) कुटुंब नियोजन कार्यक्रम, क्षयरोग निर्मूलनासाठी निक्षय योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरण वेळेत मिळावा. आरोग्य विभागाने सादर केलेल्या नाविन्यपूर्ण आरोग्यविषयक प्रस्तावांना मंजूरी मिळावी .राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मानधन व तांत्रिक यंत्रणा क्रिटिकल के केअर व एकात्मिक सार्वजनिक प्रयोगशाळा त्वरित मिळावी. अशाही मागण्या करण्यात आल्या.
या बैठकीत राज्यातील आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी केंद्र शासन सकारात्मक असून, आवश्यक ते सहकार्य मिळेल असा विश्वास आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला. बैठकीस राष्ट्रीय आरोग्य अभियान तसेच महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
_________________________&&_____
फोटो महाराष्ट्रातील आरोग्य सेवेबाबत नवी दिल्ली येथे चर्चा करताना आरोग्य मंत्री व केंद्रीय आरोग्य सचिव आणि वरिष्ठ अधिकारी (छाया- निनाद जगताप, दिल्ली)




