सातारा(अजित जगताप) : सातारा जिल्ह्यातील सहकारी अग्रणी बँक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अरुणाचल प्रदेशच्या अभ्यास दौऱ्यासाठी आठवडाभर जिल्हा बँकेचे पदाधिकारी, अधिकारी, संचालक पुढील आठवड्यात रवाना होणार आहेत. नाबार्डच्या कामकाजामुळे सरव्यवस्थापक या दौऱ्यात सहभागी होणार नसल्याची माहिती हाती आली आहे.
या अभ्यास दौऱ्यामुळे सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील महाबळेश्वर, जावळी, पाटण यांसारख्या दुर्गम आणि डोंगराळ भागांतील शेतकऱ्यांना आणि महिला बचत गटांना अधिक सुलभ डिजिटल सेवा, सूक्ष्म कर्ज पुरवण्यासाठी बँकेला नवीन
कल्पना मिळतील. तसेच अरुणाचलमधील
ग्रामीण महिला बचत गट (SHGs) अतिशय
दुर्गम भागात लघुउद्योग आणि शेतीपूरक
व्यवसायांसाठी सूक्ष्म कर्ज (Micro Loans )
कसे वापरतात आणि त्यांची बँक वसुली कशी
असते? याचा जिल्हा बँक काळजीपूर्वक अभ्यास करणार आहेत. तेथील स्थानिक आदिवासींच्या गरजा पूर्ण करणाऱ्या मोठ्या आकाराच्या आदिवासी बहुउद्देशीय सहकारी संस्थांचे (LAMPS) कार्य आणि त्यांना मायक्रो फायनान्सद्वारे दिली जाणारी मदत सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक समजून घेणार आहे. भारताचा उगवता सूर्य समजणाऱ्या अरुणाचल प्रदेशात अत्यंतविखुरलेली लोकसंख्या असतानाही कर्जाची
थकबाकी न होऊ देता मायक्रो फायनान्स
मॉडेल कसे यशस्वी करायचे, याचे व्यवस्थापन
अभ्यास दौऱ्यातील अभ्यास संचालक व पदाधिकारी आत्मसात करणार आहेत.
अरुणाचल प्रदेशसारख्या डोंगराळ आणि कमी इंटरनेट कव्हरेज असलेल्या भागात बँकिंग सेवा विनाव्यत्यय कशा चालवल्या जातात? याचे थेट मॉडेल अभ्यास दौऱ्यात असणार आहे.इंटरनेट नसताना किंवा वीज नसतानाही
‘मायक्रो एटीएम’ (Micro ATM) आणि
‘बायोमेट्रिक उपकरणांद्वारे व्यवहार कसे पूर्ण
केले जातात, याचे तंत्रज्ञान बँक समजून घेईल.
फायनान्शियल इन्क्लुजन सॉफ्टवेअर: केंद्र
सरकारच्या धोरणानुसार सहकारी संस्था आणि
LAMPS (आदिवासी बहुउद्देशीय सहकारी
संस्था) यांचे १००% संगणकीकरण व
• डिजिटल प्रणालीचा वापर बँक जवळून
पाहिल.नाहरलागुन (Naharlagun) : अरुणाचल प्रदेश राज्य सहकारी शिखर बँकेचे मुख्य कार्यालय येथे असल्याने, मुख्य
प्रशासकीय बैठक आणि सादरीकरण याच
ठिकाणी होणार आहे. इटनगर येथील वित्तीय संस्था, नाबार्ड
(NABARD) क्षेत्रीय कार्यालय किंवा सरकारी
दुर्गम भागातील नेटवर्क आव्हानांवर मात करणारी कार्यपद्धत पाहिली जाणार आहे.
इंटरनेट नसताना किंवा वीज नसतानाही’मायक्रो एटीएम’ (Micro ATM) आणि’बायोमेट्रिक उपकरणांद्वारे व्यवहार कसे पूर्ण केले जातात, याचे तंत्रज्ञान बँक समजून घेईल.
फायनान्शियल इन्क्लुजन सॉफ्टवेअर , मायक्रो फायनान्स, डिजिटल बँकिंग याचे अभ्यास दौऱ्यात समावेश आहे.
नाहरलागुन (Naharlagun) : अरुणाचलप्रदेश राज्य सहकारी शिखर बँकेचे (Apex Bank) मुख्य कार्यालय येथे असल्याने, मुख्य प्रशासकीय बैठक आणि सादरीकरण याचठिकाणी होण्याची दाट शक्यता असते. इटनगर (Itanagar): राज्याची राजधानी असल्याने तेथील वित्तीय संस्था, नाबार्ड
(NABARD) क्षेत्रीय कार्यालय किंवा सरकारी
दुर्गम भागातील नेटवर्क कामकाजाची माहिती घेतली जाणार आहे.अरुणाचल प्रदेशसारख्या डोंगराळ आणि कमी
इंटरनेट कव्हरेज असलेल्या भागात बँकिंग सेवा
विनाव्यत्यय कशा चालवल्या जातात, याचे थेट
मॉडेल सातारा जिल्हा बँक पाहेल.
ऑफलाईन व कमी बँडविड्थ तंत्रज्ञान:इंटरनेट नसताना किंवा वीज नसतानाही’मायक्रो एटीएम’ (Micro ATM) आणि
‘बायोमेट्रिक उपकरणांद्वारे व्यवहार कसे पूर्ण
केले जातात, याचे तंत्रज्ञान बँक समजून घेणार आहे. अशी माहिती वेंकट मेहता फाउंडेशनच्या व जिल्हा बँकेच्या सौजन्याने उपलब्ध झाली आहे. या दौऱ्यासाठी अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
——————————————————————-
फोटो– जिल्हा बँक मुख्यालय व अरुणाचल प्रदेश राजधानी इटानगर (छाया- अजित जगताप)




