ताज्या बातम्या

सातारा जि. प. बांधकामा विभागात काही फायली होऊ लागल्या गायब?

सातारा(अजित जगताप) : सातारा जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कारभाराच्या प्रदीर्घ सेवेनंतर लोकशाही मार्गाने स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणूक झाली. आता जिल्हा परिषद गजबजले असतानाच सातारा जिल्हा परिषद दक्षिण बांधकाम विभागात काही ठेकेदारांच्या फायली अचानक गायब होऊ लागलेले आहेत? याबाबत तेरी भी चूप और मेरी भी चुप असे समजून कुणी तक्रारी करत नसल्याची बाब उघड झाली आहे.

सातारा जिल्हा परिषद बांधकाम विभाग हा ग्रामीण भागात नागरी सुविधा उपलब्ध करण्यासाठी महत्त्वाचा दुवा आहे. एका अर्थाने ग्रामीण भागातील दळणवळण वाहिनीच्या माध्यमातील बांधकाम विभाग स्विच आहे. असे काही जण समजतात. ग्रामस्थांच्या विविध समस्यांचे निवारण करण्यासाठी तसेच विकास, निर्मिती आणि देखभालीसाठी जबाबदार बांधकाम विभागाकडे विभागून देण्यात आलेले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची पहिली पायरी म्हणजे सातारा जिल्हा परिषद बांधकाम विभाग होय.
प्रस्ताव सादर केल्यानंतर त्या प्रस्तावाबबत
निधी उपलब्ध नुसार तांत्रिक सल्ला व मंजुरी घेण्याचे काम आणि अंदाजपत्रक तयार करणे जिल्हा परिषदेच्या इतर विभागांना (उदा. शिक्षण, आरोग्य) त्यांच्या इमारतींच्या बांधकामासाठी तांत्रिक मान्यता देणे आणि अंदाजपत्रक तयार करणे.पारदर्शकतेसाठी बांधकामांच्या ई-निविदा प्रसिद्ध करणे, कार्यारंभ आदेश देणे आणि बांधकामाचा दर्जा व गुणवत्ता तपासणे.सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन यांचेकडील शासन निर्णय क्र-झेडपीएस-१०८५/२८५२/सीआर-२३७/प्र-२ दि-२ जानेवारी १९८६ नुसार बांधकाम विभाग दक्षिण या विभागाची स्थापना करणेत आलेली असून बांधकाम विभाग दक्षिण मध्ये सातारा जिल्ह्यातील माण,खटाव,कराड,पाटण व जावली असे एकूण ५ उपविभाग आहेत. या विभागातील काही ठेकेदारांची कार्यारंभ पासून ते देयक धनादेश हातात येईपर्यंत अनेकांच्या टेबलवर घिरट्या माराव्या लागतात.
सातारा जिल्हा परिषदेमध्ये पारदर्शक व गुणवत्तेप्रमाणे बांधकाम विभागाचे काम करणाऱ्या ठेकेदारांचा आजही नावलौकिक आहे. त्यांना कोणत्याही नेत्याची शिफारस लागत नाही. आपल्या गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी केलेली कामे आजही ग्रामस्थ कौतुकाने दाखवतात. ही बाब सातारा जिल्हा परिषदेसाठी अभिमान आहे. काही अधिकारी वर्ग सुद्धा चांगले काम व्हावे म्हणून प्रामाणिक प्रयत्न करतात. हे सुद्धा नमूद करावे वाटत आहे. कमी दराची निविदा असली तरी वेळेत विकास कामे दर्जेदार व्हावे यासाठी अधिकारी व ठेकेदार सुद्धा प्रयत्न करतात.

प्रशासकीय मान्यता: जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती किंवा जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेतून या कामाच्या आर्थिक तरतुदीला आणि प्रशासकीय मान्यतेला अंतिम मंजुरी मिळते. गाव विकास ते राष्ट्र विकास निविदा प्रक्रिया
निविदा प्रसिद्धी: मंजुरी मिळालेल्या कामांसाठी महाराष्ट्र शासनाच्या ई-टेंडरिंग पोर्टलवर निविदा प्रसिद्ध केल्या जातात.
पात्रता आणि बोली: नोंदणीकृत ठेकेदार पोर्टलवर निविदेत भाग घेतात. दोन पाकीट प्रणाली (तांत्रिक आणि आर्थिक बिड) द्वारे सर्वात कमी दराची निविदा मंजूर केली जाते.
अनामत रक्कम व करार: निविदा मंजूर झाल्यावर ठेकेदाराला अनामत रक्कम आणि सुरक्षा ठेव भरावी लागते. त्यानंतर बी एक फॉर्मवर जिल्हा परिषद आणि ठेकेदार यांच्यात अधिकृत करारनामा केला जातो. कामाचे मोजमाप व गुणवत्ता नियंत्रकामार्फत तपासणी व मोजमाप पुस्तिकेमध्ये टप्प्याटप्प्याने नोंदी हा बांधकाम विभागाचाच भाग असला तरी सध्या फाईलच गायब होत असल्याने ठेकेदार चिंतेत आहे. जर महत्त्वाच्या कामाची फाईल गायब होत असेल तर मग देयक कसं मिळणार? याची चिंता काही ठेकेदारांना लागली आहे.
सातारा जिल्हा परिषदेमधील बांधकाम विभागामध्ये दररोज किमान ५० ठेकेदार हे आपल्या कामकाजाबाबत चौकशीसाठी हेलपाटे मारतात. त्यातील काही जणांना नियमाप्रमाणे जीएसटी उपकर आणि आवश्यक देयक अदा करून सुद्धा त्यांची कामे होत नाहीत. काही लोकप्रतिनिधींनी नेमलेले कामवाटप समितीचे विशेष अधिकारी कार्यकर्ते यांचे कामे पटकन होतात. चमत्कार का करतोय ? हे सर्वश्रुत आहे. पण त्याबाबत कोणी आवाज उठवत नाही. कारण पाण्यात राहून माशाची वैर करणे कुणालाही परवडत नाही. हे जरी खरं असले तरी सध्या एका विभागाच्या काही फायली गायब होत असल्याने सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत संबंधित ठेकेदाराला उपाशी तापाशी राहूनच प्रार्थना करावी लागते. कधी एकदा फाईल सापडेल? व काम होईल? याकडे त्यांचे लक्ष लागलेले असते तर दुसऱ्या बाजूला त्यांन सोबत आणलेल्या
सहकार्याला सुद्धा वाट बघून नको रे बाबा… सातारा जिल्हा परिषद बांधकाम विभाग…. असे म्हणण्याची पाळी आली असल्याचे अनेकांनी पाहिले आहे. त्यामुळे आता सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम व अध्यक्ष उपाध्यक्ष निजाकडे लक्ष घालावे अशी मागणी होऊ लागलेली आहे.

———————————————————
फोटो —सातारा जिल्हा परिषदेमध्ये गायब फायलीचा शोध घेण्यासाठी बांधकाम विभागात थांबलेले ठेकेदार (छाया — अजित जगताप)

Scroll to Top