सातारा(अजित जगताप) : सातारा जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती सौ. ऋतुजा विराज शिंदे व समाज कल्याण सभापती श्री ऋषिकेश धायगुडे- पाटील यांच्या प्रयत्नाने आज समिती सदस्यांच्या परवानगीने ऐनवेळीचे विषय मंजूर करण्यात आले आहे. यामुळे खऱ्या अर्थाने आता सातारा जिल्हा परिषदेमध्ये बऱ्याच कालावधीनंतर विकास पर्व सुरू झाले आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर खऱ्या अर्थाने लोकशाही पुन्हा एकदा रुजली आहे. सातारा जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीच्या वतीने महाराष्ट्रात पहिल्यांदा ए आय प्रशिक्षण व महिलांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी मेळावा आयोजित केला जाणार आहे. डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून व्यावसायिक ज्ञान आणि सायबर क्राईम पासून बचाव करण्यासाठी महिलांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. व्यवसायभिमुख आवश्यक असणाऱ्या हिशोब व कर प्रणाली याबाबतही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अंगणवाडीच्या पोषण आहारामध्ये गव्हाच्या खिरीमध्ये साखरे ऐवजी आता पौष्टिक गुळाचा वापर केला जाणार आहे ज्या बालकांना मधुमेहाचा त्रास होत आहे त्याचीही काळजी घेतली जाणार आहे. स्वतःच्या संरक्षणासाठी मुलींना कराटे व जुडो प्रशिक्षण राणी लक्ष्मीबाई यांच्या नावाने योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे स्मार्ट अंगणवाडी व डिजिटल अंगणवाडी याचेही नियोजन केले आहे स्मार्ट टीव्ही च्या माध्यमातून उच्च शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. आरोग्य तपासणी, शैक्षणिक साधन उपलब्ध करणे.अंगणवाडी स्मार्ट बनवणे . उत्तम दर्जाचा आहार देणे. याबाबतही महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. अशी माहिती महिला बालकल्याण समितीच्या सभापती सौं.ऋतुजा विराज शिंदे यांनी पत्रकारांना दिली. यावेळी महिला व बालकल्याण समितीचे सदस्य सौ. शैलजा प्रदीप शिंदे, सौ.सारिका रत्नदीप फाळके, सौ.अलका बाळकृष्ण जगदाळे, सौ.पूजा अमित मोरे,कुमारी मृणाल महेश पाटील, सौ. विजया संताजी थोरात, सौ.छाया सुभाष जाधव, सौ.राजेश्वरी दयानंद भोसले, सातारा जिल्हा परिषद जिल्हा कार्यक्रम अधिकारी नागेश ठोंबरे, संजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. महिला व बालकल्याण समितीच्या वतीने विविध विषयावर चर्चा करण्यात आली यामुळे वीस टक्के जिल्हा परिषद स्व निधीतून ऑनलाईन अर्ज होते त्या ऐवजी ऑफलाइन पद्धतीने अर्ज घेण्यास मंजुरी मिळाली. त्याचबरोबर वीस टक्के डिजिटल जोड रस्ते,समाज मंदिर यासाठी अनुक्रमे पाच लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली असून ही निधीची तरतूद वाढवून अनुक्रमे दहा लाख व सात लाख मर्यादा वाढवण्याची मान्यता देण्यात आलेली आहे. विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना लॅपटॉप देण्यात येतात त्यामध्ये कला वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी नव्याने समावेश करण्यात आला आहे. अशी माहिती समाज कल्याण सभापती ऋषिकेश अविनाश धायगुडे पाटील यांनी पत्रकारांना दिली. दरम्यान, सातारा जिल्हा परिषदेमध्ये पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर खऱ्या अर्थाने लोकशाही कार्यपद्धत दिसून आलेले आहे. सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रियाताई शिंदे, उपाध्यक्ष राजू भैया भोसले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन व अधिकारी वर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामाला गती मिळत असल्याने सातारा जिल्ह्यात समाधान पसरले आहे. जिल्ह्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व इतर सर्व मंत्री, आमदार यांचे सहकार्य लाभत असल्याची माहिती सभापती यांनी दिली. यावेळी विविध प्रसारमाध्यमाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभापतींनी सर्वांचे मनापासून स्वागत केले.—————————— फोटो सातारा जि प बाल कल्याण समिती सभापती सौभाग्यवती ऋतुजा विराज शिंदे व समाज कल्याण सभापती ऋषिकेश अविनाश धायगुडे पाटील




