पालघर – कुडूस ता.वाडा जि.पालघर येथे रंगतदार साहित्य कला मंडळ आयोजित पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक सत्यवान मंडलिक यांच्या ‘इथे जन्मली माणुसकी’ या कथासंग्रहास प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व रोख रक्कम १०००/- रुपये देऊन कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉ.ज्योतीताई ठाकरे (कोकण मराठी साहित्य परिषद सल्लागार) यांचे हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्रातून आलेल्या कथासंग्रह , कादंबरी, कवितासंग्रह या विभागातील उत्कृष्ट साहित्य कृतीच्या साहित्यिकांनाही सन्मानित करण्यात आले. व्यासपीठावरील विचारवंतांनी आपले साहित्याविषयी विचार व्यक्त केले. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी विश्वनाथ पाटील साहेब )(कुणबी सेना प्रमुख), प्रवीण दवणे (कोमसाप पालघर जिल्हा अध्यक्ष), डॉ. प्रेरणा राऊत (इतिहास संशोधिका), दिलीप कोरे (कोकण विभाग ग्रंथालय संघ अध्यक्ष), बाळ कांदळकर (कोमसाप ठाणे जिल्हा अध्यक्ष), लक्ष्मण पाटील (कला समीक्षक), अशोक पाटील (ज्येष्ठ पत्रकार), राजेंद्र वेखंडे (माजी उप प्राचार्य ज्ञानसाधना कॉलेज ठाणे), डॉ. प्रमोद पाटील (रंगतदार साहित्य कला मंडळ सदस्य), संभाजी मोरे (संपादक टिटवाळा टाइम्स), राजेंद्र कोंगिल (सरपंच-कुडूस), मुदस्सर पटेल (उपसरपंच-कुडुस), डॉ. गिरीश चौधरी (माजी उपसरपंच), रंजन पाटील (उद्योजक नेहरोली), दिलीप पाटील (मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालय आबिटघर) इत्यादी मान्यवर उपस्थित होते.तसेच लेखक योगेश गोतारणे यांच्या ‘गाव शहरांचा मागोवा’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सुंदर असे नियोजन रंगतदार प्रकाशनचे अध्यक्ष विजय जोगमार्गे व सर्व सदस्य रंगतदार साहित्य कला मंडळ यांनी केले होते.




