ताज्या बातम्या

शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठानची राज्य कार्यकारिणी बैठक उत्साहात संपन्न

मुंबई

: शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने १९ एप्रिल २०२६ रोजी फोर्ट, मुंबई येथील ठाकर्मी हाऊस येथे राज्य कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. बैठकीचे अध्यक्षस्थान संस्थापक अध्यक्ष राजाराम बुवा शेलार यांनी भूषविले.
राज्यभरातील विविध जिल्ह्यांतील अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्याध्यक्ष गणेश पाटील, उपाध्यक्ष अॅड. प्रल्हाद भिलारे, अॅड. साम्या कोरडे, युवराज दिसले, विद्याताई डमढेरे, अॅड. साईश जाधव आदी मान्यवरांची उपस्थिती होती. विविध जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शनपर भाषणे केली.
बैठकीत मागील सभेचा आढावा घेऊन नव्या राज्य कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. संस्थेच्या सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्याचा आढावा घेऊन पुढील सहा महिन्यांचा आराखडा निश्चित करण्यात आला. सदस्य नोंदणी वाढविणे, स्थानिक पातळीवर कार्यक्रम राबविणे व संघटन बळकट करण्यावर भर देण्यात आला.
आगामी पुरस्कार सोहळे व जनजागृती उपक्रमांबाबतही चर्चा झाली. संघटक सचिव संदीप जाधव यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. बैठकीस राज्यातील १७ जिल्ह्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Scroll to Top