सातारा(अजित जगताप) : पीएम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय सातारा विद्यालयाचा इयत्ता दहावी सीबीएसई बोर्ड चा निकाल घोषित झाला असून या निकालाची प्रतिवर्षाप्रमाणे यशाची परंपरा कायम ठेवण्याची भूमिका विद्यार्थी व शिक्षकांनी पार पाडली आहे. अथक परिश्रम व सततचा अभ्यास करून विद्यार्थ्यांनी शंभर टक्के निकाल देण्याचे सत्र कायम ठेवले आहे. कु.वैष्णवी किशोर जाधव व जीवन सरकाळे यांनी प्रत्येकी 97.20 टक्के गुण प्राप्त करत प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळविला आहे. कु. अनुष्का विक्रम ढोले 97 टक्के गुण मिळवून दुसरी आली आहे. तर कु. संचिता समाधान भोईटे ही 96.20 टक्के गुण प्राप्त करून तिसऱ्या स्थानावर आहे. मराठी विषयात 80 पैकी 40 विद्यार्थ्यांनी शंभर पैकी 100 मार्क तसेच सामाजिक शास्त्र विषयात जीवन सरकाळे विद्यार्थ्याने 100 पैकी 100 मार्क प्राप्त करण्याचा विक्रम गाठला आहे. मराठी विषयाचे शिक्षक श्री सचिन कळनार यांच्यावर ही जिल्ह्यातून तसेच नवोदय विद्यालय समितीच्या अधिकाऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सर्वच विषयात उच्चांक ठेवण्याचा प्रताप ही विद्यार्थ्यांच्या नावे बहाल झाला आहे. विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या प्राचार्या, उपप्राचार्य व शिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले. माननीय कलेक्टर महोदय, शिक्षणाधिकारी तसेच विद्यालय मॅनेजमेंट कमिटीच्या सर्व सदस्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. पालक शिक्षक संघाच्या वतीने ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.




