ताज्या बातम्या

चेंबूर येथे भीमजयंतीनिमित्त महामानवाला शैक्षणिक मानवंदना. आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी आयोजित उपक्रमाला प्रतिसाद

मुंबई – भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त चेंबूर संविधिन चौक येथे महामानवाल शैक्षणिक मानवंदना हा उपक्रम राबविण्यात आला .सदर उपक्रमाला जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला जमा झालेले शैक्षणिक साहीत्य लवकरच आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना वितरीत केले जाणार असल्याची माहीती सामाजिक कार्यकर्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक समितीचे अध्यक्ष व या उपक्रमाचे आयोजक रमेश मोकळ यांनी दिली.
भारतरत्न डाॅ.बाबासाहैब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मुंबईसह देशभरात काल विविध उपक्रम तसेच मिरवणुका काढून साजरी करण्यात आली.चेंबूर शेलकाॅलनी साईबाबा नगर,नाना नानी पार्क येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे एक वही, एक पेन अभियानांतर्गत महामानवाला ‘शैक्षणिक मानवंदना’ देण्याचे आवाहन येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेश मोकळ व सहका-यांनी केले होते. या उपक्रमांतर्गत डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान चौक येथील शिल्पाला अनेक मान्यवर व आंबेडकरी अनुयायांनी वह्या, पेन पुस्तकांची आदरांजली वाहून मानवंदना दिली.
नगरसेविका कु. कशिश राजेश फुलवारीया, माजी नगरसेवक श राजेश फुलवारीया,माजी नगरसेविका .वंदनाताई गौतम साबळे,काँग्रेस नेते सुभाष भालेराव,शिवसेना शाखा प्रमुख . राजू थोरात, मनसेचे सर्वश्री कृष्णा सोनी,सतीश नाडर, बालाजी नाडर, भाजपाचे सर्वश्री रामस्वरूप गोयल,छगन मौर्या, नवीन बुचिया,नित्यागजेंद्र नाडर, करण निरभवणे, नुपूर गुप्ता,आम आदमी पक्षाचे .अतनू मुखर्जी, रिपाईचे .नितीन कांबळे, कामगार नेते .लक्ष्मण साळवे,समाजसेवक रामवृक्ष चौधरी,श्रीनिवास नायडू,राहुल वाघमारे, अभिषेक कांबळे,आशिष आनंद,राजू गायकवाड,अमित खाडे,अरविंद सिंग, संजय पवार, सुभाष जैस्वार,हिरजी बगडा,विजय भद्रशेटे,छोटूराम कुडिया,ताराचंद पलिया,रतन कन्नर, संजय जगताप,जयश्री सातपुते, दिपेश हिरे, सुरेश जतन,राकेश कांबळे, शंकर साळुंखे, सचिन माने,नवीन जाधव, सुनील शिरसाट, कन्ना स्वामी,मुकेश सकट, रवींद्र मोकल, सुरेश मोकल, महेंद्र लव्हांडे, दिलीप चौधरी, प्रदीप खरे, प्रदीप जगताप,बॉबी पार्टे,अनिल कदम, अरविंद कांबळे, जलील शेख, बाबासाहेब लिहिणार, गणेश जावळे, सुरेश बगाडे, शैलेश कांबळे,संजय बेलकर,हे यावेळी उपस्थित होते.
सदर उपक्रमांतर्गत जमा झालेले शैक्षणिक साहीत्य लवकरच समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना वितरीत केले जाणारअसल्याचे मोकळ यांनी सांगितले.

Scroll to Top