ताज्या बातम्या

शिवसमर्थच्या संस्थेच्या मराठी दिनदर्शिकेचे थाटात लाेकार्पण : मराठी संस्कृतीचा वारसा घराघरात पाेहचणार

तळमावले : तळमावले येथील अँड जनार्दन बाेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु केलेल्या दि शिवसमर्थ मल्टीस्टेट काे. ऑप. क्रे. साेसायटीने मराठी नुतन वर्षाचे औचित्य साधून सर्वांग सुंदर जय जय रघुवीर समर्थ दिनदर्शिका शके 1948 चा लाेकार्पण साेहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या साेहळ्याला सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली हाेती. मराठी संस्कृती सण उत्सव आणि ऐतीहासिक वारसा पुढच्या पिढीपर्यंत पाेहचवण्याच्या उद्देशाने शिवसमर्थ संस्था/परिवार आणि कल्पेश पाटसकर दिनदर्शिका समुह यांच्या संकल्पनेतून या दिनदर्शिकेची निर्मिती करण्यात आली आहे. या दिनदर्शिकेचे मुख्य आकर्षण म्हणजे समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनावरती आधारित अनेक प्रसंगाचे छायाचित्रण करुन प्रत्येक मराठी महिन्याची सविस्तर माहिती आणि त्या महिन्यातील नैसर्गिक बदलांचे महत्त्व अधाेरेखित करण्यात आले आहेत.
मंगळवार दि. 14 एप्रिल 2026 राेजी यशवंत चव्हाण स्मृती सदन कराड येथे समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह, निरुपनकार याेगेश बुवा रामदासी यांच्या शुभहस्ते तसेच शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अ‍ॅड. जनार्दन बाेत्रे साहेब, सीईओ श्री. हेमंत तुपे, व्यवस्थापक श्री. नितीन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी शिवसमर्थ संस्था आणि परिवारातील संचालक श्री. हणमंत माने, श्री. नामदेव माने, श्री. चंद्रकांत चव्हाण, साै. शाेभा बाेत्रे, ंसल्लागार श्री. सुदाम िफरंगे, श्री. प्रकाश सावंत, श्री. नानासाहेब सावंत, श्री. आशिष थाेरात, श्री. रमेश पाटील, श्री. लक्ष्मण माने, श्री. विठ्ठलराव पाचुपते, विद्या माने तसेच संस्थेचे ठेवीदार, हितचिंतक माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.
कार्यक्रमाची सुरुवात दिनदर्शिकेमध्ये छापण्यात आलेल्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे शुभारंभ करुन करण्यात आली. श्रीफळ वाढवून प्रभूरामाची आरती करण्यात आली. यावेळी पुराेहितांनी केलेल्या मत्रांच्या उच्चारांनी वातावरण मंगलमय झाले हाेते. तद्नंतर रंगमंचावर शिवसमर्थच्या लाेगाेचे प्रतिमा पूजन करुन दिपप्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कराड येथील प्रांजल डान्स अ‍ॅकॅडमीच्या चिमुकल्यांनी सादर केलेल्या कला अविष्काराला उपस्थितांनी भरभरुन दाद दिली. त्यामध्ये कथ्थक, प्रभुरामचंद्रावरील आधारीत भजन यांचा समावेश हाेता. कलाविष्कार झालेनंतर रंगमंचावरती मुख्य साेहळ्यास सुरुवात झाली. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. संदीप डाकवे यांनी केले. तर प्रास्ताविक संस्थेचे संचालक श्री. चंद्रकांत चव्हाण यांनी मांडले. तद्नंतर निरुपणकार याेगेश बुवा रामदासी यांचे शुभहस्ते, शिवसमर्थ परिवाराचे कुटुंबप्रमुख अ‍ॅड. जनार्दन बाेत्रे साहेब, सीईओ श्री. हेमंत तुपे, श्री. कल्पेश पाटसकर यांच्या उपस्थितीत दिनदर्शिकेचे लाेकार्पण साेहळा पार पडला. यावेळी शिवसमर्थ संस्था आणि परिवाराच्या वतीने मान्यवरांचा संस्थेचे सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच कल्पेश पाटसकर दिनदर्शिका समुहाच्यावतीने मान्यवरांना प्रभुरामांची श्रीमूर्ती, शाल व गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. याेगेश बुवा रामदासी आणि श्री. हेमंत तुपे यांनी आपले मनाेगते यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाचा समाराेप पसायदानाने करण्यात आला.

Scroll to Top