ताज्या बातम्या

नायगावमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

नायगाव : नायगाव परिसरातील नामांकित भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या वतीने महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी उपस्थितांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नायगाव-वडाळा विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते.
यामध्ये सहनिरीक्षक श्री. सुरेश गणपत काळे, उपविभाग समन्वयक श्री. प्रशांत घाडीगांवकर, शाखाप्रमुख श्री. समीर दळवी, कार्यालय प्रमुख श्री. जनार्दन शिंदे, उपशाखाप्रमुख श्री. महेश सुर्वे, तसेच प्रदीप कदम, राजा सोनावणे आणि वाई तालुका संपर्कप्रमुख श्री. दामोदर पांडकर आदी शिवसैनिकांनी सहभागी होऊन अभिवादन केले.
कार्यक्रमाद्वारे डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्याबरोबरच समाजात एकात्मता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला.

Scroll to Top