ताज्या बातम्या

साई दवाखान्याच्या बांधकामाविरोधात दि: २१ एप्रिल रोजी उपोषण…

सातारा(अजित जगताप) : सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास सरकारी यंत्रणा सातारा जिल्ह्यात कमी पडत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खाजगीकरण व्यवसायिक व दवाखाने सुरू आहेत. यातील काही अपवाद वगळता बऱ्याच ठिकाणी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची लूट केली जाते. वास्तविक पाहता ज्या सोयी दवाखान्यासाठी आवश्यक आहेत त्या नसताना सुद्धा हे दवाखाने कसे काय चालू आहेत ? असा आता प्रश्न नातेवाईक विचारू लागलेले आहेत. त्याचे पुढचे पाऊल म्हणजे साताऱ्यात क साई दवाखान्याच्या विरोधात रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र नेते श्री रमेश अनिल उबाळे यांनी २१ एप्रिल रोजी उपोषणाचा इशारा दिल्याने खळबळ माजले आहे. जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी श्री मल्लिकार्जुन माने यांना त्यांनी निवेदन देऊन याबाबत तातडीने कारवाई करण्याची विनंती केली आहे.

सातारा नगरपालिका हद्दीतील सर्वच हॉस्पिटल यांची चौकशी व्हावी, मंजूर केलेले बांधकामाचे आराखडे , पूर्णत्वाचे दिलेले दाखले, सध्यस्थितीत बांधलेले बांधकाम याची फेर चौकशी करून अनधिकृत बांधकामे काढावीत व त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून सदरच्या इमारती रद्द करण्यात याव्यात. चुकीचा पद्धतीने प्लॅन मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्याच्या संपत्तीची चौकशी करून त्यांना निलंबित करावे. कारण, कोणतेही वाहन तळे नसताना या इमारतीला परवानगी कशी काय?
बेसमेंट मध्ये भाडेतत्त्वावर चालू असलेले कॅन्टीन कसे काय चालते? अनधिकृत बांधकाम वाढवून सुद्धा त्याबाबत कारवाई का नाही? क साई दवाखाना रुग्णांच्या सेवेसाठी आहे का ?याचा खुलासा सातारा नगरपालिकेने करावा. दुर्दैवाने मोठा अपघात घडल्यास जीवित हानी वाचवण्यासाठी या इमारतीकडे जाण्याचा मार्ग सापडत नाही. हा मार्गच बंद केला आहे . अशी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची तक्रार असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
सातारा स्पेशलिस्ट डॉक्टर बोलवतो. असे सांगून गरीब रुग्णांवर उपचार करताना दलाल निर्माण झालेले आहेत का? याचाही खुलासा करावा. अशी मागणी करण्यात आली आहे.
सातारा शहरात मोठ्या प्रमाणात चांगल्या सुविधा देणारे भरपूर दवाखाने आहेत. ते प्रसिद्धीपासून अलिप्त असूनही त्यांना रुग्णांची कमतरता नाही. गुणवत्तेच्या जोरावर एक मानवता भावनेतून सेवा केली जात आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले जातात तर दुसऱ्या बाजूला मुख्या जनावरांसाठी जसे कसाई खाणे आहेत. तशा पद्धतीने काही सराईत दवाखाने हे खिंडीत अडवून नातेवाईकांचा कार्यक्रम करीत असतात.
सातारा जिल्हा व सातारा शहरातील बरेच दवाखान्याच्या उद्घाघाटनासाठी हातापाया पडून लोकप्रतिनिधींना बोलवून सामान्य माणसावर दबाव आणला जात होता. हे आता स्पष्ट झाले आहे. यावर आळा बसवण्यासाठी सातारा नगरपालिका हद्दीतील सर्वच दवाखाने मंजूर आराखड्यातील संक्शन केलेले बांधकाम व सर्व नियमावली प्रमाणे सर्व एन ओ सी, तसेच पूर्णत्वाचे दाखले दिलेली कागदपत्रे याची फेरतपासणी व चौकशी झालीच पाहिजे, अन्यथा संपूर्ण सातारा जिल्ह्यातील कार्यकर्ते उपोषण आंदोलनात सहभागी होणार आहेत. या आंदोलनामुळे सामान्य रुग्णांना दिलासा देण्यासाठीच आम्ही प्रयत्नशील आहोत. दरम्यान, राज्याच्या सातारा जिल्ह्यातील चार मंत्र्यांनी या बाबींकडे एक वचननामा दिला असे समजून कारवाई व्हावी. यासाठी आता सातारकर मतदार त्यांच्याकडे आशाळभूतपणाने पाहत आहे. असेही सूचित केले आहे.

._________________________________

फोटो — सातारा शहरातील क साई दवाखान्याच्या विरोधात निवेदन देताना श्री रमेश अनिल उबाळे (छाया– अजित जगताप, सातारा)

Scroll to Top