कराड(प्रताप भणगे) : महाराष्ट्रात सुरू असलेल्या मतदान सखोल पुनः निरीक्षण प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात पारदर्शकतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कराड दक्षिण काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदार सौ. कल्पना ढवळे यांना निवेदन देत मतदार यादीतील दुबार, बोगस तसेच मतदारसंघाबाहेरील अनिवासी मतदारांची नावे वगळण्यासाठी स्पष्ट आणि पारदर्शक कार्यपद्धती जाहीर करण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, कराड दक्षिण मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर दुबार व संशयित नावे असल्याचे दिसून येत असून, निवडणूक प्रशासनाने या संदर्भात नेमकी काय कार्यवाही केली जाणार आहे याची सविस्तर माहिती सार्वजनिक करावी. तसेच संपूर्ण मतदान पुनःनिरीक्षण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यासाठी सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिक पत्रकार यांची बैठक बोलावून एक संयुक्त समिती स्थापन करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
यावेळी कराड दक्षिण काँग्रेस कमिटी अध्यक्ष नामदेवराव पाटील, युवा नेते इंद्रजीत चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस भानुदास माळी, पंचायत समिती सदस्य संग्राम पवार, रवींद्र बडेकर, सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी सोशल मीडिया अध्यक्ष दिग्विजय सूर्यवंशी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सेक्रेटरी प्रदीप जाधव, माजी नगरसेवक अशोकराव पाटील, कराड दक्षिण महिला काँग्रेस अध्यक्षा वैशाली जाधव, सातारा जिल्हा काँग्रेस एससी-एसटी विभाग अध्यक्ष संजय तडाखे, दीपक पाटील, मुकेश मोहिते अक्षय सुर्वे, देवदास माने, शरद पाटील, अवधूत पाटील, आबा सूर्यवंशी, असिफ नदाफ, दिग्विजय जमाले, निवास जाधव, समीर इनामदार आदी पदाधिकारी उपस्थित होते.




