ताज्या बातम्या
बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?कराड तालुक्यातील घोगाव येथे दुर्दैवी घटना‘बेस्ट’ संपावर तातडीने तोडगा काढून ‘नीट’ परीक्षार्थींना दिलासा द्या – माजी खासदार राहुल शेवाळे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

चक्क कवडीवर साकारली शिवरायांची सिंहासनारुढ़ प्रतिमा

तळमावले/वार्ताहर : दरवर्षी 6 जून हा दिवस शिवराज्याभिषेक सोहळा म्हणून साजरा केला जातो. यंदा किल्ले रायगडावर 351 वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येत आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने हजारो शिवप्रेमी नेहमीच अनोख्या माध्यमातून शिवरायांना अभिवादन करण्याचा प्रयत्न करत असतात.
याच पार्श्वभूमीवर पाटण तालुक्यातील डाकेवाड़ी (काळगांव) येथील शेतीमित्र डॉ.संदीप डाकवे यांनी चक्क कवडीवर चित्रकलेतून शिवराज्याभिषेक सोहळा साकारला आहे. काळ्या रंगामध्ये सिंहासनारूढ छत्रपती शिवाजी महाराज रेखाटले आहेत. याद्वारे अनोखी शिवभक्ती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
जवळपास 1.5 सेमी×1 सेमी इतक्या कमी पृष्ठभागावर भव्य सोहळा रंगांच्या माध्यमातून त्यांनी हे दृश्य रेखाटले आहे. चित्रकार डॉ.डाकवे यांनी सादर केलेला हा कलाप्रकार छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो, असंच यातून भासत आहे. यापूर्वी त्यांनी शाळेच्या भिंतीवर ऑइल पेंट ने आणि कागदावर दोन वेळा पोस्टर रंगातून शिवराज्यभिषेक साकारला होता.

Scroll to Top