ताज्या बातम्या

आजीवाली येथे आनंदवन प्रीमियर लीग २०२६ मध्ये आनंदवन संघर्ष योद्धा टीम विजयी

पनवेल(अमोल पाटील) : आजिवली ता.पनवेल येथे आनंदवन प्रीमियर लीग २०२६ आनंदवन गृहनिर्माण सोसायटीने क्रिकेटचे सामने ठेवण्यात आले होते. प्रथम व द्वितीय क्रमांक मिळणाऱ्या संघाला श्री अनिल मुकादम यांच्यातर्फे ट्रॉफी ठेवण्यात आले होती. सोसायटीमधील अनेक दानशूर व्यक्तींनी प्रत्येक सामन्यांना मोलाचे सहकार्य केले. तसेच आयोजकांनी शिस्तबद्ध क्रिकेटचे सामने यशस्वीरित्या पार पाडले .
मुले मुली एकत्रित क्रिकेटचे सामने खेळवण्यात आले. सामन्यामध्ये लहान मुलांचा व मुलींचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळाला. महिला व ज्येष्ठ नागरिकांनी सुद्धा क्रिकेटचा आनंद घेतला. सात संघामध्ये क्रिकेट सामने खेळवून अंतिम सामना आनंदवन संघर्ष योद्धा व आनंदवन टायगर यांच्यामध्ये चुरशीची लढत झाली. शेवटी क्रिकेटच्या सामन्यांमध्ये आनंदवन संघर्ष योद्धा विजय ठरली तर उपविजेता आनंदवन टायगर टीम झाली. क्रिकेटच्या सामन्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर आनंददायी वातावरण निर्माण झाले होते. सोसायटीतील नागरिकांनी लहान मुलांचे कौतुक करून शाबासकीची पाठीवर थाप मारली. या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक सर्व परिसरात होत आहे.

Scroll to Top