ताज्या बातम्या
बैठकीच्या पार्श्वभूमीवर ‘लाँग मार्च’ स्थगित; पाणी संघर्ष चळवळीचा निर्णयपरिवहन विभाग १ मे ते १५ ऑगस्ट दरम्यान विशेष पडताळणी मोहीम राबविणार;अमराठी चालकांना मराठीचे धडेही देणार — परिवहन मंत्री प्रताप सरनाईकझांस्कर ( लडाख) येथे पहिले जिल्हाधिकारी होण्याचा मान दहिवडीच्या ओंकार राजेंद्र गुंडगे यांना …शरद प्रतिभाषाली सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या मुंबई अध्यक्षपदी हास्य अभिनेते अरुण कदम यांची नियुक्तीनोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालये आता खासगी संस्थांकडून चालविली जाणार; नव्या ६० केंद्रांना मंजुरी ग्राहकांना अतिरिक्त सेवाभार म्हणून सुमारे ५,२०० रुपये मोजावे लागणार

माथेरानला जायचं आहे,पर्यटकांसाठी खुश खबर….

प्रतिनिधी : माथेरान हे थंड हवेचं ठिकाण असून अनेक तरूण मंडळी आणि पर्यटकांना नेहमीच खुणावत असते. दरवर्षी लाखोंच्या संख्येने माथेरान येथे पर्यटक येत असतात. माथेरानमधील प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी एक ते दोन दिवसांपेक्षा अधिक कालावधी लागतो. मात्र राहण्याची चांगली सोय नसल्याने पर्यटक वनडे प्लान करतात. माथेरानमध्ये पर्यटकांना राहण्यासाठी छोटी-मोठी हॉटेल उपलब्ध आहेत. मात्र पर्यटकांना राहण्यासाठी सर्वोत्तम सुविधा प्रदान करण्याच्या उद्देशाने मध्य रेल्वे प्रशासनाकडून पॉड हॉटेल सुरू करण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर पहिले पॉड हॉटेल सुरू करण्यात आले. पुढे मध्य रेल्वेच्या सीएसएमटी स्थानकात पॉड हॉटेलची सुविधा उपलब्ध करण्यात आली. या पॉड हॉटेलमध्ये पर्यटक आणि प्रवाशांना उत्तम सुविधा प्रदान करण्यात येते. पॉड हॉटेलला मिळणाऱ्या पसंतीमुळे मध्य रेल्वेने पर्यटकांच्या सुविधेसाठी माथेरानमध्ये पॉड हॉटेल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरामदायी आणि किफायतशीर निवासाचा पर्याय म्हणून पॉड हॉटेल येत्या ऑगस्ट महिन्यात पर्यटकांसाठी खुले होणार आहे.

Scroll to Top