ताज्या बातम्या
बैठकीच्या पार्श्वभूमीवर ‘लाँग मार्च’ स्थगित; पाणी संघर्ष चळवळीचा निर्णयपरिवहन विभाग १ मे ते १५ ऑगस्ट दरम्यान विशेष पडताळणी मोहीम राबविणार;अमराठी चालकांना मराठीचे धडेही देणार — परिवहन मंत्री प्रताप सरनाईकझांस्कर ( लडाख) येथे पहिले जिल्हाधिकारी होण्याचा मान दहिवडीच्या ओंकार राजेंद्र गुंडगे यांना …शरद प्रतिभाषाली सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या मुंबई अध्यक्षपदी हास्य अभिनेते अरुण कदम यांची नियुक्तीनोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालये आता खासगी संस्थांकडून चालविली जाणार; नव्या ६० केंद्रांना मंजुरी ग्राहकांना अतिरिक्त सेवाभार म्हणून सुमारे ५,२०० रुपये मोजावे लागणार

आचारसंहितेत अडकला ” आनंदाचा शिधा “

प्रतिनिधी(रमेश औताडे) : हातावर पोट असणाऱ्यांनी रोज कमवायचे व रोजचा उदरनिर्वाह करायचा असे असताना शिधावाटप दुकानाचा आधार होता.पोटाची खळगी भरताना सरकारने दिलेले खराब का असेना ते खाऊन तृप्तीची ढेकर देणारा मेरा भारत महान असे म्हणणारा गरीब नागरीक आनंदी असायचा. मात्र त्याचा आनंद मात्र निवडणुकीमुळे लुप्त झाला आहे. शिधावाटप अधिकारी म्हणतात की,  निवडणुकीनंतर ” आनंदाचा शिधा ” मिळेल. गुढीपाडवा तरी गोड होईल या आशेवर चार पाच चकरा शिधा दुकानावर मारून आलेले शिधा ग्राहक मात्र भर उन्हाळ्यात शिधा न मिळाल्याने नाराज झाले आहेत.

गुढीपाडवा व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून राज्य सरकारने शिधापत्रिका धारकांना ” आनंदाचा शिधा ” देण्याची घोषणा केली होती. गुढीपाडवा साजरा केला तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली मात्र शिधा काही मिळाला नाही.आता निवडणूक आहे त्यामुळे आतपण शिधा वाटप नाही. शंभर रुपयांत शिधा अशी जाहिरात करण्यासाठी सरकारने करोडो रुपये खर्च करून आपलीच पाठ थोपटली.त्यानंतर साडी वाटप सुरू केले. फाटक्या साड्या देऊन गरिबांची चेष्टा केली.अशी प्रतिक्रिया शिधापत्रिका धारक देत आहेत.

मतदार राजा हा निवडणुकीत उमेदवारांच्या मागे मोफत वडापाव व पाणी पित भिकाऱ्यासारखा फिरत आहे.त्याला किमान शिधा तरी द्या अशी मागणी होऊ लागली आहे.आज भूक लागली आहे निवडणूक झाल्यावर सोने जरी दिले तरी त्याने भूक शमणार आहे का ? असा संतप्त सवाल गरीब जनता करत आहे. त्यामुळे आनंदाचा शिधा मिळत नसल्याने मतदार राजा आनंदी नाही. 

Scroll to Top