ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

धारावीतील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात देवशयनी एकादशीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी; विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

्रतिनिधी : धारावीतील खांबदेव नगरमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यंदा या मंदिराचा ५६ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला असून, यानिमित्ताने दिवसभर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

या विशेष दिवशी राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते योगेश चिकटगावकर यांच्या “पिंगळा महाद्वारी” या भक्तिपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच संतोष लिंबोरे निर्मित स्वर साक्षी प्रतिष्ठान आयोजित “हरिनामाचा गजर” या कार्यक्रमाने उपस्थितांची मनं जिंकली.

कार्यक्रमासाठी धारावीच्या आमदार डॉ. ज्योतीताई गायकवाड, शिवसेना विभाग संघटक विठ्ठल पवार, माजी नगरसेवक वसंत नकाशे, शाखाप्रमुख सतीश कटके, किरण काळे, आनंद भोसले, दीपक काळे, तसेच धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजू बिटकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी मंदिराला भेट दिली.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष संजय धुमाळ व त्यांच्या समितीतील सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रमाची तयारी केली. या सोहळ्यादरम्यान विठ्ठल रुक्मिणी हाउसिंग सोसायटीमधील दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार आमदार डॉ. गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला.

संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हालेला होता आणि एकादशीनिमित्त शेकडो भाविकांनी मंदिरात हजेरी लावून विठूमाऊलीचे दर्शन घेतले. या कार्यक्रमांमुळे खांबदेव नगरमधील विठ्ठल भक्तांचा उत्साह अधिक वाढला.

Scroll to Top