ताज्या बातम्या
साताऱ्यात अननस फळाला मोठी मागणी… साताऱ्यात अननस फळाला मोठी मागणी, अननस खरेदीसाठी ग्राहकांची गर्दीनारायण सुर्वे जन्मशताब्दी निमित्त कोपरखैरणेत रंगले ‘खुले कवी संमेलन’; सौ. जयश्रीताई पाटील यांचा विशेष सन्मानआदानींच्या पथदिव्यांनी बोरीवली पूर्व उजळले ; नागरिकांना दिलासाराष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ९२ विनाअनुदानित शाळांना अनुदान मंजूर‘थँक्यू आई-बाबा!’… चिमुकल्या स्पंदनच्या पत्राने पालकांचे डोळे पाणावले; साहित्यापेक्षाही मौल्यवान ठरली मुलाची कृतज्ञता; पोस्टातून आलेल्या पत्राने दाटला पालकांचा कंठ

छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी छावा संस्थेकडून पेण येथे ठिय्या आंदोलन

पेण(पी.डी.पाटील): स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक पेण नगर पालिका चिंचपाडा शांतिनिकेतन सोसायटी समोर उभे रहावे यासाठी २३ जून रोजी सकाळी ११.०० वाजता पेण नगर पालिका येथे छावा क्रांतिवीर सामाजिक संस्थेमार्फत ठिय्या आंदोलन होणार आहे.
महाराजांच्या स्मारकासाठी तसेच त्यांनी स्वराज्यासाठी केलेल्या त्यागाचा इतिहास पुढील पिढीला अवगत व्हावा यासाठी मागील ४ वर्षे छावा संस्थेकडून संघर्ष सुरू आहे. मात्र पेण नगर पालिका व तेथील निगरगट्ट प्रशासनास यांचा विसर पडला आहे . त्यांना छत्रपतींचा इतिहास स्मरणात आणून देण्यासाठी सदर संस्थेकडून ठिय्या आंदोलन करण्याचे ठरवले आहे.
तरी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे सर्व मावळे, सामाजिक संस्था, संघटना, समाज सेवक, राजकीय पक्ष व त्यांचे पदाधिकारी या सर्वांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन छावा क्रांतिवीर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री जितेंद्र राम ठाकूर यांनी केले आहे.

Scroll to Top