ताज्या बातम्या
साताऱ्यात अननस फळाला मोठी मागणी… साताऱ्यात अननस फळाला मोठी मागणी, अननस खरेदीसाठी ग्राहकांची गर्दीनारायण सुर्वे जन्मशताब्दी निमित्त कोपरखैरणेत रंगले ‘खुले कवी संमेलन’; सौ. जयश्रीताई पाटील यांचा विशेष सन्मानआदानींच्या पथदिव्यांनी बोरीवली पूर्व उजळले ; नागरिकांना दिलासाराष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ९२ विनाअनुदानित शाळांना अनुदान मंजूर‘थँक्यू आई-बाबा!’… चिमुकल्या स्पंदनच्या पत्राने पालकांचे डोळे पाणावले; साहित्यापेक्षाही मौल्यवान ठरली मुलाची कृतज्ञता; पोस्टातून आलेल्या पत्राने दाटला पालकांचा कंठ

नवी मुंबईतील अनधिकृत शाळांची यादी जाहीर – पालक व व्यवस्थापनांना महानगरपालिकेचा इशारा

नवी मुंबई : शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अनेक प्राथमिक शाळा शासनाची अथवा नवी मुंबई महानगरपालिकेची मान्यता न घेता अनधिकृतपणे चालविल्या जात असल्याचे उघडकीस आले आहे. मार्च 2025 अखेर झालेल्या तपासणीत या शाळांची नोंद घेण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 मधील कलम 18 नुसार, कोणतीही नवीन शाळा मान्यतेशिवाय सुरू करता येत नाही. मात्र, संबंधित शाळा व्यवस्थापनाने या कायद्याचे उल्लंघन केले असून, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याला धोका निर्माण झाला आहे.

महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे की, अशा अनधिकृत शाळांचे व्यवस्थापक पालकांशी तात्काळ संपर्क साधून विद्यार्थ्यांना जवळच्या मान्यताप्राप्त शाळांमध्ये दाखल करतील, तसेच अनधिकृत शाळा त्वरित बंद करतील. अन्यथा कलम 18(5) नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या शाळांमध्ये आपल्या पाल्यांचे प्रवेश घेतलेल्या पालकांनी देखील तत्काळ तो प्रवेश रद्द करून शासनमान्य शाळांमध्ये नवीन प्रवेश घ्यावा, जेणेकरून त्यांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.

नवी मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की, नवीन प्रवेश घेताना शाळेची अधिकृत मान्यता तपासूनच निर्णय घ्यावा.

Scroll to Top