ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

शिवसेना शाखा क्रमांक ६६ (उ.बा.ठा)तर्फे लता गोपीनाथ शिंदे( वय-७६ वर्ष )या आजीला सहारा

मुंबई (शांताराम गुडेकर) : शिवसेना शाखा क्रमांक ६६ (उ.बा.ठा) विभागात राहणाऱ्या लता गोपीनाथ शिंदे( वय-७६ वर्ष )या आजी रस्त्यावर राहात होत्या.त्यांच्याकडे झोपायला सुद्धा जागा उपलब्ध नव्हती.त्यांचा सांभाळ करायला किंवा काळजी घ्यायला कोणीच नाही अशी माहिती शिवसेना शाखा क्र. ६६च्या उप महिला संघटिका श्रद्धा वाल्मिकी व गटप्रमुख धर्मराज यांना मिळाली.त्यानंतर लता ताईंची व्यथा शाखेवर येऊन सांगितले.त्यांची अडचण लक्षात घेऊन मीनाली पाटील(शाखा संघटिका)यांनी लता गोपीनाथ शिंदे( वय-७६ वर्ष )यांना विरार येथील मराठा फॉउंडेशन विरार पूर्व या आश्रमात घेऊन जाण्याचा व तेथे त्यांची राहण्याची व जेवणाची सोय करून सहारा दिला.या विभागाचे विधानसभा संघटक श्री.संजय मानाजी कदम,व उपविभागप्रमुख प्रसाद आयरे, उदय महाले (शाखाप्रमुख ) यांच्या मार्गदर्शनाने व शिवसेनेच्या पक्षाच्या आशीर्वादाने हे काम पार पडले असे मत यानिमित्ताने बोलताना मीनाली पाटील(शाखा संघटिका)यांनी व्यक्त केले.

Scroll to Top