ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरमध्ये निवासी उपजिल्हाधिकाऱ्याला ५ लाखांची लाच घेताना ACBकडून रंगेहाथ अटक; अव्वल कारकूनही अडकल्यामुळे खळबळ

छत्रपती संभाजीनगर: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत निवासी उपजिल्हाधिकारी (RDC) विनोद खिरोळकर यांना ५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली आहे. या प्रकरणात अव्वल कारकून त्रिभुवन यांनाही अटक करण्यात आली असून, दोघांच्याही विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, शेतजमिनीच्या वर्ग २ मधील जमिनीचे वर्ग १ मध्ये रूपांतर करण्यासाठी अधिकारी खिरोळकर यांनी आधीच २३ लाख रुपये स्वीकारले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी पुन्हा १८ लाख रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी ५ लाख रुपये स्वीकारताना खिरोळकर यांना त्रिभुवन यांच्या माध्यमातून अटक करण्यात आली.

महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांत लाचखोरीच्या घटना वाढताना दिसत आहेत. ग्रामसेवक, तहसीलदार, व इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांविरोधात ACBने सातत्याने कारवाई केली आहे. अलीकडेच परभणीत एका महिला क्रीडा अधिकाऱ्याला लाच घेताना अटक करण्यात आली होती. आता छत्रपती संभाजीनगरमधील या प्रकरणाने पुन्हा एकदा प्रशासनातील भ्रष्टाचाराचा मुद्दा समोर आला आहे.

Scroll to Top