ताज्या बातम्या
धारावीकरांना ५००, चाळी-इमारतीतील रहिवाशांना १,००० चौ. फुटांची घरे द्या ; मास्टर प्लॅन व पुनर्वसनाची कायदेशीर हमी मिळेपर्यंत करार न करण्याचे आवाहन‘वाजवा शाळेचा गजर, नको रे बाबा पुन्हा गेट टू गेदर!’ जुन्या आठवणी, मैत्री आणि नातेसंबंधांचा वास्तववादी वेध; आवर्जून पाहावे असे नाटकखारघर हिल महापौर मॅरेथॉन’ स्पर्धेत आयुक्त डॉ. शिंदे यांची यशस्वी धावगणेशोत्सवाच्या उत्साहाला गालबोट! २२ फुटी ‘भुलेश्वरचा राजा’ अचानक कोसळला; २ जणांचा मृत्यू, ५ जखमी”व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

कर्जतच्या 11 नगरसेवकांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश   प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले स्वागत

प्रतिनिधी : अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत नगर पंचायतीच्या राष्ट्रवादी शरद पवार गटातील आणि काँग्रेसच्या 11 नगरसेवकांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, विजय चौधरी आदी या वेळी उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या नगरसेवकांचे पक्षात स्वागत केले. श्री. बावनकुळे यावेळी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश वेगाने प्रगती करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विकसित भारताच्या प्रयत्नांना समर्थ साथ देत आहेत. यामुळेच वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत. आजच्या प्रवेशामुळे कर्जत – जामखेड मतदार संघातील राष्ट्रवादी शरद पवार गट पूर्णपणे मोकळा झाला आहे.

Scroll to Top