ताज्या बातम्या
बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?कराड तालुक्यातील घोगाव येथे दुर्दैवी घटना‘बेस्ट’ संपावर तातडीने तोडगा काढून ‘नीट’ परीक्षार्थींना दिलासा द्या – माजी खासदार राहुल शेवाळे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

मोळाचा ओढा ते आजाद नगर पूल खचला…

शाहूपुरी : सातारा शहरा नजीक असलेल्या मोळाचा ओढा ते आझाद नगर मार्गी शाहूपुरी कडे जाणारा पूल खचल्यामुळे या ठिकाणी वाहन चालकांनी काळजीपूर्वक वाहनांची ये जा करावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र तारळेकर व अँड विलास वहागावकर यांनी केलेली आहे.
मोळाचा ओढा येथील शिंदे फर्निचर शेजारून चांगल्या पद्धतीने रस्ता तयार करण्यात आलेला आहे. या रस्त्यामुळे राजवाडा, शाहूपुरी, मंगळवार पेठ, आंबेदरे, शुक्रवार पेठ, प्रतापगड पेठ, बोगदा परिसरात आणि पुढे कास पठारावर जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर वर्दळ आहे.
अवकाळी पावसामुळे सदर मोळाचा ओढा ते आझाद नगर येथील पूल खचला गेला आहे. दिवसभरात मदत कार्य होऊ शकते. परंतु, रात्रीच्या वेळी या पुलावर अपघात झाल्यास जीवित हानी होण्याची शक्यता आहे. जीवित हानी झाल्यानंतर अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय माध्यम प्रतिनिधी नोंद घेतीलच पण त्यापूर्वी आपणच आपली काळजी घ्यावी. त्यामुळे वाहन चालकांनी विशेषतः चार चाकी वाहन चालकांनी स्वतःच्या जीवाची काळजी म्हणून या मार्गावरून जाताना पुलाच्या रस्त्याच्या अंदाज घेऊनच मार्गक्रमण करावे. अशी कळकळीची विनंती करण्यात आलेली आहे.
सदर पुलाच्या अवतीभवती झाडे- झुडपे वाढलेली आहेत. कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा या ठिकाणी सुळसुळाट असतो. उंच कचडे नसताना सुद्धा रस्ता खचल्याचे फारसं नजरेत दिसून येत नाही. परंतु, जागरूक नागरिकांनी या मार्गावरून येताना जाताना काळजी घ्यावी. स्वयंप्रकाशित व्हा… म्हणजे स्वतःच प्रकाशमान होऊन अंधारात चाचपडत बसण्यापेक्षा या मार्गावरून जाताना प्रकाश दिवे लावावेत. अशी विनंती केली आहे.
सातारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीने तसेच सातारा नगरपरिषदेने आपल्या मोठ्या व्यापातून जर सवड मिळाली तर या पुलाची देखभाल दुरुस्ती करावी. येथील स्थानिक नागरिक फार आग्रही नाही . मानवता भावनेतून शक्य होईल तेवढे लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी. ही मापक अपेक्षा व्यक्त करीत आहेत. यामध्ये कोणतेही राजकारण नाही तर जे दुर्लक्ष करतील त्यांनाही भरघोस मतदान केले जाईल. असेही स्पष्ट केले आहे.

____________________

फोटो मोळाचा ओढा ते आझाद नगर फुल खचल्याने वाहतूक व्यवस्था बिकट (छाया– निनाद जगताप, शाहूपुरी )

Scroll to Top