Sunday, December 15, 2024
घरदेश आणि विदेशजगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचा मृत्यू ११४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचा मृत्यू ११४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

प्रतिनिधी : जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. साऊथ अमेरीकेतील वेनेजुएला येथे ही व्यक्ती राहत असून 114 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

वेनेजुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादपरो यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर याबाबत माहिती दिली आहे. जुआन विसेंट पेरेज मोरा यांचा 114 व्या वर्षी निधन झाले आहे. जुआन यांचे 4 जानेवारी 2022 रोजी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातली सर्वात जास्त वयाची वृद्ध व्यक्ती म्हणून घोषित केले होते. त्यावेळी ते 112 वर्ष 253 दिवसांचे होते. जुआन यांचा जन्म 27 मे 1909 रोजी वेनेजुएलच्या ताचिरा राज्यात झाला होता. जुआन यांना 11 मुलं, 41 नातवंडे आणि 18 पतवंडे आहेत. तर त्यांच्या पतवंडांनाही 12 मुलं आहेत.

वेनेजुएला यांच्या ताचिरा राज्यातील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्यांना वयोमानानुसार उच्च रक्तदाब आणि ऐकू कमी येण्याचा त्रास होता. त्या व्यतिरिक्त ते स्वस्थ होते आणि ते कोणतंही औषध घेत नव्हते. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सद्वारा शेअर केलेल्या माहितीत त्यांनी स्वत:ला काही सवयी लावल्या होत्या. रोज कठोर परिश्रम, सुट्टीत आराम करायचा आणि नियमित देवपूजा करायचे. या सवयींनी त्यांचे आरोग्य निरोगी होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments