Sunday, December 15, 2024
घरदेश आणि विदेशमोदींचा राजीनामा १७ वी लोकसभा विसर्जित; लवकरच सरकार स्थापन करणार?

मोदींचा राजीनामा १७ वी लोकसभा विसर्जित; लवकरच सरकार स्थापन करणार?

प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीमध्ये एकट्या भाजपला बहुमत मिळवता आले नसले तरी एनडीएला पूर्ण बहुमत मिळाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा सरकार स्थापनेची तयारी सुरू केली आहे. येत्या ८ जून  रोजी मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. अनेक टीव्ही रिपोर्ट्समध्ये सुत्रांच्या हवाल्याने याबाबतचे वृत्त देण्यात आले आहे. शपथ घेतल्यानंतर, सलग तिसऱ्यांदा निवडणूक जिंकून देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होणारे ते जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर देशातील दुसरेच नेते ठरतील. राष्ट्रपती भवन ५ ते ९ जूनपर्यंत अभ्यागतांसाठी बंद असणार आहे.पंतप्रधान मोदींनी आज सकाळी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन त्यांचा आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा सुपूर्द केला. तसेच, १७ वी लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस देखील केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शपथविधी सोहळ्याच्या तयारीसाठी राष्ट्रपती भवन ५ ते ९ जूनपर्यंत अभ्यागतांसाठी बंद राहणार आहे. “राष्ट्रपती भवनात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी समारंभाच्या आगामी कार्यक्रमाच्या तयारीमुळे, राष्ट्रपती भवन (सर्किट-1) ची भेट ५ ते ९ जून २०२४ पर्यंत सर्वसामान्यांसाठी बंद राहील,” असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे ८  जून रोजीच मोदी शपथ घेतील असे सांगितले जात आहे. त्याच दिवशी नवे केंद्रीय मंत्रिमंडळही शपथ घेईल.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments