Sunday, December 15, 2024
घरदेश आणि विदेशगरिबांना मोफत वीज,चांगले शिक्षण आणि रोजगार केजरीवालची गॅरंटी

गरिबांना मोफत वीज,चांगले शिक्षण आणि रोजगार केजरीवालची गॅरंटी

प्रतिनिधी : दिल्लीतील सत्ताधारी पक्ष आम आदमी पार्टीने रविवारी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकावर जोरदार हल्ला चढवला. आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

मोदींनी दिलेल्या जुन्या आश्वासनांवर जोर देत केजरीवाल म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात 15 लाख टाकणार होते, पण तसे झाले नाही. 2 कोटी रोजगार देणार होते, पण तसेही झाली नाही. 2022 पर्यंत बुलेट ट्रेन चालवण्याच्या बाता मारत होते, पण अद्याप तसे झालेले नाही. मात्र आम्ही मोफत वीज, चांगले शिक्षण, मोहल्ला क्लिनीकचे आश्वासन दिले आणि पूर्णही केले. मोदींची गॅरंटी कोण पूर्ण करणार माहिती नाही. कारण ते आता 75 वर्षांचे होणार असून त्यांनीच बनवलेल्या नियमाप्रमाणे निवृत्त होतील. परंतु केजरीवाल यांची गॅरंटी केजरीवालच पूर्ण करेल.

एखाद्या देशामध्ये लाखो लोकं अशिक्षित असतील, शिक्षण व्यवस्था चांगली नसेल तर देशाचा विकास होणारच नाही. देशातील जनतेचे आरोग्य चांगले राहिले तरच देशाचा विकास होईल. आज देशातील सरकारी रुग्णालयांची परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे देशात प्रत्येक गल्लीत मोहल्ला क्लिनिक सुरू केले जाईल, असे म्हणत केजरीवाल यांनी देशाला 10 आश्वासने दिली.

केजरीवाल यांची गॅरंटी…

देशात 24 तास विजेची व्यवस्था करणार आणि गरिबांना मोफत वीज देणार
प्रत्येक गावात, मोहल्ल्यात चांगल्या शाळा उभारणार. देशात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलाला चांगले आणि मोफत शिक्षण मिळण्याची व्यवस्था करणार
प्रत्येक गावात, गल्लीत मोहल्ला क्लिनीक उघडणार. प्रत्येक जिल्ह्यात मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणार
राष्ट्र सर्वप्रथम – लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य देणार आणि चीनच्या ताब्यात गेलेली जमीन सोडवणार
अग्निवीर योजना लष्करासाठी घातक असून ही योजना बंद करणार. अग्निवीर योजनेद्वारे भरती झालेल्यांना पक्की नोकरी देणार
स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार शेतमालाला हमीभाव देणार
दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देणार
एका वर्षात दोन कोटी रोजगार देण्याची व्यवस्था करणार
भाजपच्या वाशिंग मशीनला भर चौकात फोडणार आणि देशाला भ्रष्टाचारमुक्त करणार
व्यापाऱ्यांसाठी जीएसटी प्रणाली अधिक सुकर करणार

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments